Zee Marathi Paaru Serial : ‘पारू’ मालिकेत प्रेक्षकांना नुकताच ड्रीम प्रपोजलचा रोमँटिक सीन पाहायला मिळाला. आदित्यने भव्यदिव्य तयारी करून पारूसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. या प्रपोजलसाठी पारू अगदी परीसारखी नटून थटून तयार झाली होती. या दोघांमधलं प्रेम आता हळुहळू बहरत जाणार आहे. पण, आदित्यची आई अहिल्यादेवीला अद्याप पारू-आदित्यच्या नात्याबद्दल काहीच माहिती नाहीये.

‘पारू’ किर्लोस्करांकडे मदतनीस म्हणून काम करत असते. घरातल्या सगळ्या लोकांची ती मोठ्या प्रेमाने काळजी घेत असते. पारूचं तिच्या देवीआईंवर म्हणजेच अहिल्यावर विशेष जीव असतो. पारूच्या याच चांगल्या स्वभावाच्या प्रेमात आदित्य पडतो आणि मालिकेत आता त्यांची लव्हस्टोरी सुरू होणार आहे.

मात्र, या दोघांच्या नात्याबद्दल अद्याप कोणालाही माहिती नसल्याने सध्या पारू आणि आदित्यला एकमेकांना भेटताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. या भावना आदित्य त्याचा भाऊ प्रीतमसमोर व्यक्त करतो. किती दिवस पारूशी नीट बोलताही आलेलं नाहीये असं तो प्रीतमला सांगतो. यावर प्रीतम मी काहीतरी जुगाड करतो असं म्हणतो.

आता प्रीतमने केलेल्या मदतीमुळे आदित्यला पारूची एकांतात भेट घेणं शक्य होणार आहे. यानिमित्ताने आदित्य आणि पारूला प्रेमाचा पहिला स्पर्श अनुभवता येणार आहे. यावेळी प्रेक्षकांना पारू एका वेगळ्याच आणि आजवर न पाहिलेल्या लूकमध्ये पाहायला मिळेल.

‘पारू’ नेहमी परकर पोलकं घालून घरात वावरत असते. आता हीच साधीभोळी पारू एका नव्या लूकमध्ये आदित्यसमोर येणार आहे. सुंदर साडी, मोकळे केस, गळ्यात नाजूक हार अन् कानातले या लूकमध्ये पारू अतिशय सुंदर दिसत असते. आदित्य पारूला या रुपात पाहून पुन्हा एकदा नव्याने तिच्या प्रेमात पडतो. यावेळी बॅकग्राऊंडला “पहला पहला प्यार है…” हे गाणं वाजत असल्याचं मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘पारू’ मालिकेचा हा विशेष भाग येत्या २६ एप्रिलला रात्री ७:३० वाजता प्रसारित होणार आहे. याचदरम्यान, गुरुजी पारूला मोठा सल्ला देणार आहेत. गुरुजी, अचानक येतात आणि पारूसमोर एक धक्कादायक खुलासा करतात. ते तिला इशारा देतात की, तिच्याच कुटुंबातील कोणीतरी तिला इजा करण्याचा कट रचत आहे. आता आदित्य आणि पारूचं प्रेम येणाऱ्या वादळातून वाचू शकेल का? हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळेल.