Zee Marathi Paaru Serial : ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेत सध्या आदित्य आणि पारूचं नातं बहरत जात असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या दोघांच्या नात्याला पारूच्या वडिलांचा विरोध असतो यामुळेच मारुती पोटच्या पोरीवर विषप्रयोग सुद्धा करतो. या सगळ्यामुळे आदित्यचा राग अनावर होतो.

मारुतीने आदित्यला अहिल्यादेवींना सगळं काही खरं सांगण्यासाठी केवळ २ दिवसांची मुदत दिलेली असते. आता आदित्य काय करणार? तो आपल्या आईसमोर पारूविषयीच्या प्रेमाची कबुली देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण, या सगळ्यात मालिकेत एका पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. या नव्या पाहुण्याचं नाव आहे परितोष.

गेल्या काही दिवसांपासून किर्लोस्कर कुटुंबीयांसमोर दामिनी सतत तिच्या भाच्याचा उल्लेख करत असते. माझा भाचा परदेशातून आलाय…वगैरे सांगत असते. आता दामिनीचा भाचा परितोष लवकरच किर्लोस्करांच्या घरी येणार आहे आणि त्याच्या एन्ट्रीने आदित्य-पारूच्या नात्यात एक वेगळं वळण येणार आहे.

परितोष आदित्यला येऊन सांगतो, “आदी ब्रो लकी आहेस तू यार…तुझ्याकडे अहिल्या आत्यासारखी आई आहे. पारूसारखी बेस्ट फ्रेंड आहे…हे डोळे पारूचे आहेत ना?” हे ऐकल्यावर आदित्यला मोठा धक्का बसतो. आता परितोषला पारूच्या डोळ्यांचं सत्य समजल्यावर पुढे मालिकेत काय ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

‘पारू’ मालिकेत परितोषची भूमिका लोकप्रिय अभिनेता सक्षम कुलकर्णी साकारणार आहे. यापूर्वी सक्षमने ‘लव्ह लग्न लोचा’सारख्या गाजलेल्या मालिकेत काम केलेलं आहे. याशिवाय ‘दे धक्का’, ‘पक् पक् पकाक’, ‘आंबट गोड’, ‘अल्याड पल्याड’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘झी मराठी’ वाहिनीवर ही मालिका रोज संध्याकाळी ७.३० वाजता प्रक्षेपित केली जाते. ‘पारू’ मालिकेचा हा विशेष भाग २३ जूनला प्रसारित करण्यात येणार आहे. मालिकेत या नव्या पाहुण्याला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. आता हा नवीन पाहुणा आदित्य-पारूच्या आयुष्यात नेमकं कोणतं वादळ आणणार?, अहिल्यादेवीसमोर पारू-आदित्यच्या नात्याचं सत्य केव्हा उघड होणार? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.