Paaru Serial Upcoming Twist: पारू व आदित्य यांच्या प्रेमकहाणीमध्ये सध्या नवनवीन ट्विस्ट येताना दिसत आहेत. आदित्यने पारूला त्याच्या मनातील भावना सांगितल्या आहेत. आता मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आदित्य व पारूचा ‘तो’ फोटो पाहून अहिल्यादेवीचा संताप अनावर

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आदित्यची आई म्हणजेच अहिल्यादेवी किर्लोस्कर संतापात असल्याचे दिसते. प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, अहिल्यादेवी एका प्रेसमध्ये गेली आहे. ती तेथील एका व्यक्तीसमोर हातातील वर्तमानपत्र फेकत म्हणते की, ही बातमी कोणी दिलीय? त्याला बोलवा. तुमच्या पेपरचा खप वाढावा म्हणून तुम्ही काय वाटेल त्या बातम्या छापाल का? अहिल्यादेवी ज्या बातमीबद्दल बोलत असते, त्या बातमीत आदित्य व पारू यांचा एक फोटो पाहायला मिळतो.

प्रोमोमध्ये पुढे दिसते की, आदित्य एका वर्तमानपत्रात ती बातमी बघत प्रीतमला विचारतो की यांच्यापर्यंत ही बातमी कशी काय पोहोचली? त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसत आहे. प्रीतम त्याला सांगतो की, आईला सगळं कळलंय. आदित्य प्रीतमला म्हणतो की, मी असंही आईला सगळं सांगणारच होतो. त्यावर प्रीतम त्याला सांगतो की आईनं तुला आणि पारूला बाहेर एका ठिकाणी बोलावलंय. दुसरीकडे पारू पेपरमधील तो फोटो पाहत म्हणते की, माझ्या आणि आदित्यसरांच्या नात्याबद्दल देवीआईंना संशय तर आला नसेल ना?

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, अहिल्यासमोर येईल का पारू आणि आदित्यच्या नात्याचं सत्य?, अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, पारू मालिकेत दाखविल्याप्रमाणे, आदित्य व पारूच्या प्रेमाविषयी प्रीतमला माहीत आहे. मात्र, त्याच्या कुटुंबातील इतरांना किंवा पारूच्या वडिलांना त्याबद्दल काहीच माहीत नाही. अहिल्यादेवीला आदित्यसाठी तिच्यासारखीच एखादी मुलगी पत्नी म्हणून हवी आहे. आता आदित्यचे पारूवर प्रेम असल्याचे समजताच ती काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण- अहिल्यादेवीला जरी पारू आवडत असली आणि जरी तिचा पारूवर विश्वास असला तरी पारू ही कमी शिकलेली आहे. किर्लोस्करांच्या घरात काम करणारी आहे. त्यामुळे तिला तिची सून म्हणून ती मान्यता देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.