Savalyachi Janu Savali fame Savali’s look on Navratri: ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील सावली प्रेमाने घरातील, तसेच प्रेक्षकांचीही मने जिंकताना दिसत आहे.
सावली जरी प्रेमळ, मायाळू असली तरी संकट समोर असल्यानंतर ती खंबीरपणे त्याला तोंड देते. सारंगला वेळोवेळी मदत करते. त्याच्यावर मनापासून प्रेम करते. सारंग नेहमीच सावलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो.
ऐश्वर्याला सावली आवडत नाही. याला कारण म्हणजे सावली गरीब घरची, सावळ्या रंगाची आहे. त्यामुळे सारंगसारख्या श्रीमंत मुलाशी तिचे लग्न होणे ऐश्वर्याला मान्य नाही. सारंगची आई तिलोत्तमादेखील गोऱ्या रंगाला अवाजवी महत्त्व देते. तिलाही सावली आवडत नाही.
जरी ती तिला सून म्हणून मान्य करीत नसली तरी वेळेनुसार तिचे सावलीबद्दलचे मत मवाळ होताना दिसत आहे. सावली मेहेंदळे आणि सारंगच्या आयुष्यातून कायमची निघून जावी, यासाठी ऐश्वर्या सतत कारस्थानं करते. त्यासाठी ती ताराला हाताशी धरते. आता ती शिवानीला सावलीविरुद्ध मदत करताना दिसत आहे.
सावलीचा लूक चर्चेत
आता सावली म्हणजे अभिनेत्री प्राप्ती रेडकर तिच्या मालिकेतील भूमिकेमुळे नाही, तर तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सावलीचा नवरात्रीचा नवव्या दिवशीचा लूक पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये सावलीचा सुरुवातीला मेकअप केला आहे. त्यानंतर तिने सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. त्यावर सुंदर दागिने घातले आहेत. कपाळावर चंद्रकोर लावली आहे. बाजूबंद घातले आहेत. शेवटी ती तिचा चष्मा घालताना दिसत आहे. त्यानंतरच्या फोटोशूटदरम्यान, व्हिडीओमध्येदेखील तिने तिचा मालिकेतील चष्मा घातल्याचे दिसत आहे.
नेटकरी काय म्हणाले?
सावली गुलाबी साडीत अत्यंत सुंदर दिसत आहे. आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ‘पारू’ फेम शरयू सोनावणेने सुंदरी अशी कमेंट करीत अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. मेघा धाडेने लिहिले, “अति सुंदर, नितांत सुंदर, माझी साऊ”, भाग्यश्री दळवीने लिहिले, “सुंदर.” तसेच अनेक नेटकऱ्यांनीदेखील कमेंट्स केल्या आहेत.

एका नेटकऱ्याच्या कमेंटने लक्ष वेधले आहे. नेटकऱ्याने लिहिले, “सावली + सुंदर = सादर. आजची कोल्हापूरची देवी हे हुबेहूब रूप आहे. गव्हाळी रंगावर गुलाबी पैठणी अणि सोन्याचे आभूषणे खूप सुंदर दिसत आहेत. फक्त देवीने चष्मा घातला नाही.” असे लिहीत हसण्याची इमोजी शेअर केली आहे. इतर नेटकऱ्यांनी लिहिले, “मनमोहिनी”, “चष्मा पाहिजेच का?”, “सावलीच्या चष्म्याने सुंदर लूक दिसत आहे”, “सावलीचा चष्मा काढून फोटो काढायला पाहिजे”, “चष्मा”, “क्यूट”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.



आता सावळ्याची जणू सावली मालिकेत शिवानीच्या येण्याने नवीन वळण आले आहे. सावली या सगळ्याला कशी सामोरी जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.