What Will Savali Do To Stop Taras Wedding: ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सध्या ट्विस्ट पाहायला मिळत आहे. त्यामध्ये ताराचे लग्न होत असल्याचा प्रसंग आहे. ताराची आई भैरवी तिचे तिच्या मनाविरुद्ध लग्न लावून देत असल्याचे दृश्य त्यात आहे.

ताराचे लग्न थांबविण्यासाठी सावली घेणार जोगतिणीचे रूप

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘सावळ्याची जणू सावली‘ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, ताराच्या हळदीचा कार्यक्रम आहे. तारा सोहमला फोन करते आणि त्याला म्हणते की, आज जर माझ्या अंगाला म्हात्रेची उष्टी हळद लागली, तर मी जीव देईन. त्यानंतर सावली सोहमकडे जाते. त्यावेळी तिला ताराचे लग्न थांबविण्यासाठी तिच्याकडे काही प्लॅन आहे का असे विचारले जाते. त्यावर सावली कोणता प्लॅन नाही, पण प्लॅन करणारा माणूस माहित असल्याचे सांगते. त्यानंतर जगन्नाथ तिथे दिसतो.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सावलीने तिचे रूप बदलले आहे. ती जोगतिणीच्या रूपात आली आहे. ती ताराच्या कार्यक्रमात जाते. सावली म्हणते की, या कार्यक्रमात विघ्न येणं अशक्य आहे; पण नसेल, तर कोणी काहीही करू शकणार नाही. त्यानंतर ती तेथील अग्निकुंडात काहीतरी टाकते. सगळीकडे धूर होतो. लोकांच्या डोळ्यांत धूर जातो. त्यांना दिसणे बंद होते. याचाच फायदा घेऊन सोहम व सावली तिथून ताराला घेऊन जातात.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ताराच्या मदतीसाठी नव्या रूपात सावली धावून जाणार, अशी कॅप्शन दिली आहे. आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “सावली ताराला मदत करीत आहे. ताराला तिचे प्रेम मिळवून देत आहे. याची जाणीव तिने ठेवावी. तारासुद्धा आईप्रमाणेच सावलीचा अपमान करीत आहे.”

दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “सावली खूप छान दिसत आहे.” एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप छान कल्पना आहे.” तर अनेकांनी सावलीच्या दिसण्याचे कौतुक केले आहे; तर काहींनी ताराने सावली तिची जी मदत करीत आहे, त्याची जाणीव ठेवावी, असे लिहिले आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सोहम व तारा एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. मात्र, भैरवी ताराचे लग्न दुसऱ्या मुलाशी करण्याच्या तयारीत आहे. जेव्हा सोहमने तिलोत्तमाला त्याच्या व ताराच्या प्रेमाबद्दल सांगितले. तेव्हा तिलोत्तमा भैरवीकडे सोहमचे स्थळ घेऊन गेली होती. तेव्हा भैरवीने तिला नकार दिला. आता सावली ताराला मदत करीत असल्याचे दिसत आहे.

सावली ही गरीब कुटुंबातील आहे. तिचा लहान भाऊ आजारी असतो. त्यामुळे तिच्या घरच्यांना पैशांची गरज असते हे ओळखून भैरवीने सावलीचा आवाज तिच्याकडे गहाण ठेवून घेतलाय. त्या बदल्यात ती सावलीच्या घराची काळजी घेईल, त्यांना पैसे देईल, असे वचन तिने दिलेय. त्यामुळे सावली भैरवीच्या मुलीसाठी म्हणजेच तारासाठी गाते. जगाला जो आवाज ताराचा आहे, असे वाटते; पण प्रत्यक्षात तो खरे तर सावलीचा आवाज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता सोहम व ताराचे लग्न होऊ शकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.