Savalyachi Janu Savali upcoming twist: ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका सध्या मोठ्या चर्चेत आहे. सावली मेहेंदळे कुटुंबात हळूहळू स्वत:चे स्थान निर्माण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या तिलोत्तमा घरात नसल्याने घराची जबाबदारी ऐश्वर्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे, सावलीला त्रास देण्याची नवीन संधी ऐश्वर्याला मिळाली आहे. ताराला हाताशी धरून ती कट कारस्थान करताना दिसते. ताराला सावलीच्या विरोधात अनेक गोष्टी सांगते. सावलीचे महत्व वाढले, तर तुला महत्व मिळणार नाही, असा विश्वास ऐश्वर्या ताराला पटवून देते. त्यामुळे तारादेखील सावलीविरुद्ध कट करत असल्याचे पाहायला मिळते.
तारा व ऐश्वर्या करणार सावलीविरुद्ध कारस्थान
आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की तारा रागात आहे. ती ऐश्वर्यासमोर रागाने सावलीबद्दल बोलत आहे. ती म्हणते, “मला त्या सावलीचा बदला घ्यायचाच आहे”, त्यावर ऐश्वर्या तिला म्हणते, “घे मग, तुझ्याकडे संधी चालून आली आहे.”
यावर तारा म्हणते, “म्हणजे?” ऐश्वर्या तिला सांगते, “अमृता वहिनी सकाळीच बाहेर गेली आहे. नील आणि सारंग ऑफिसला गेले आहेत.” ऐश्वर्याचे बोलणे ऐकूण तारा पुढे म्हणते,”…आणि बबलू आणि सोहमसुद्धा घरी नाहीत. तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे?”
ऐश्वर्या ताराला सांगते, “आज तिला काहीतरी खास स्वयंपाक बनवायचा आहे. त्यासाठी तिला किचन लागणार. पण, आपण तिला किचन द्यायचंच नाही.”
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सावली घराबाहेर, चुलीवर स्वयंपाक बनवते. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “ऐश्वर्या आणि तारा सावलीच्या कामात अडथळा आणणार”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखिवल्याप्रमाणे, तारा व आणि ऐश्वर्या दोघींना सावली आवडत नाही. आता घरात सावली सर्वांची मने जिंकत असल्याचे पाहून दोघी एकत्र येऊन, तिच्याविरुद्ध कट करताना दिसत आहेत. सावली तिच्यावर येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जात असल्याचे पाहायला मिळते. या सगळ्यात सारंग तिला वेळोवेळी साथ देतो. तिच्या बाजूने उभा राहतो. सावली आणि सारंग यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.