Savalyachi Janu Savali upcoming twist: ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. या मालिकेत सतत येणारे ट्विस्ट आणि सावली व सारंग यांच्यात दिवसागणिक घट्ट होत जाणारे नाते, यामुळे या मालिकेला प्रेक्षक दाद देताना दिसत आहेत.

सावळ्याची जणू सावली‘ मालिकेत सावली नावाची गरीब घरातील सावळ्या रंगाची मुलगी पाहायला मिळते. जिचा आवाज खूप छान आहे. मात्र, तो आवाज भैरवी वझेच्या मुलीसाठी म्हणजेच तारासाठी भैरवीकडे गहाण ठेवलेला आहे. त्या बदल्यात सावलीच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचे वचन भैरवीने तिला दिले आहे. तसेच सावलीला गाण्याचे प्रशिक्षणही दिले आहे, त्यामुळे सावली गाणे म्हणते आणि तारा गाणे म्हणत असल्याचा अभिनय करते, त्यामुळे तारा ही लोकप्रिय गायिका म्हणून प्रसिद्ध आहे.

दुसरीकडे सारंग हा मेहेंदळे घरातील सर्वांचा लाडका आहे. उद्योग जगतात मोठे नाव असलेल्या मेहेंदळे कुटुंबाला समाजात प्रतिष्ठेने वागवले जाते. या कुटुंबातील तिलोत्तमाला गोऱ्या वर्णाचा गर्व आहे. तिला सावळ्या रंगाची लोकं आवडत नाहीत, त्यामुळे ती सावलीचा तिरस्कार करते. सावलीने सारंगबरोबर लग्न झाल्यानंतर सारंगसह घरातील इतरांची मने जिंकली. आता तिलोत्तमाबरोबरचे तिचे नाते सुधारण्याची संधी मिळणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

तिलोत्तमावर संकट ओढवणार

झी मराठी वाहिनीने ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, तिलोत्तमा पाय घसरून पडते, त्यावेळी तिथे सावली असते. ती तिलोत्तमाचा आवाज ऐकून तिच्याजवळ येते, त्यावेळी तिलोत्तमा तिला रागाने मला कोणाचीही मदत नको असे सांगते. त्यानंतरही सावली तिलोत्तमापुढे मदतीचा हात पुढे करते. ती तिलोत्तमाला म्हणते की मला माहीत आहे की तुम्हाला माझ्या मदतीची गरज नाही, पण मला मदत करू द्या. त्यानंतर ती तिलोत्तमाला बेडवर बसण्यास मदत करते.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की सावली सारंगला फोन करते, त्यावेळी सारंग त्याच्या वडील आणि भावाबरोबर गाडीत असतो. सावली सारंगला फोन करून सांगते, “तुम्ही लवकर या”; सारंग लवकर येतो असे तिला सांगतो. फोन ठेवल्यानंतर सारंगचे वडील त्याला म्हणतात की या निमित्ताने सावली व तिलोत्तमाला एकत्र आणण्याची आपल्याला एक संधी मिळत आहे.

सावली डॉक्टरांना बोलावते. ते गेल्यानंतर तिलोत्तमाला म्हणते, “हवी ती शिक्षा द्या, पण मी ऐकणार नाही”, असे म्हणून ती तिलोत्तमाची सेवा करताना दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “नशिबाचा खेळ, तिलोत्तमा आणि सावलीला एकत्र आणणार का?”, अशी कॅप्शन दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता सावली व तिलोत्तमा यांच्यातील अंतर कमी होणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.