Savalyachi Janu Savali upcoming twist: ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत काही दिवसांपूर्वी शिवानीची एन्ट्री झाली आहे. तिच्या येण्याने सावली-सारंगच्या नात्यामध्ये दुरावा येणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

शिवानीला सारंग तिच्या आयुष्यात हवा आहे. त्यासाठी ती विविध कट कारस्थाने करत आहे. काही दिवसांपूर्वी ती सारंगच्या घरी राहण्यासाठी आली आहे. सावली मेहेंदळे कुटुंबाच्या आणि सारंगच्या आयुष्यातून बाहेर जावी यासाठी ऐश्वर्या तिला सगळ्यात मदत करत आहे.

सावली व सारंग हे दोघे एकमेकांपासून दूर व्हावेत, असे ऐश्वर्याला सुरुवातीपासूनच वाटते, त्यासाठी ती अनेक गोष्टी करते. याआधीदेखील तिने अनेकदा असे प्रयत्न केले आहेत. आता शिवानी आल्यामुळे ऐश्वर्या व ती एकत्र येत सारंग व सावलीला दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

मालिकेत पुढे काय घडणार?

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर सावळ्याची जणू सावली मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सारंग व सावली एका खोलीत बसले आहेत. सारंग सावलीला विचारतो की पूजा झाली का? त्यावर सावली हो म्हणते. पण, सावली शांत असलेली पाहून सारंग तिला विचारतो की की काय झालं आहे? त्यावर सावली त्याला म्हणते की शिवानी मॅडमचं या घरात काय चालू आहे, हेच मला कळत नाही.

सारंग तिला म्हणतो की मी एक काम करतो, शिवानीला सांगतो की कुटुंबाला जाणून घेण्याची जी तिच्या कंपनीची पॉलिसी आहे. त्याचा काही उपयोग होत नाही. तू तुझ्या घरी जा. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की शिवानी तिच्या सेक्रेटरीला म्हणते की मला हवी असलेली गोष्ट जर मला मिळाली नाही तर त्याचं काय होतं, हे तुला चांगलंच माहित आहे. तिचे हे बोलणे ऐकूण तिची सेक्रेटरी घाबरली आहे, असे दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सावली सारंगचे डोळे वेळीच उघडू शकेल का?”, अशी कॅप्शन दिली आहे.

आता सावळ्याची जणू सावली मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.