Savalyachi Janu Savali Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत गरीब घरातील, सावळ्या रंगाची सावली व श्रीमंत व गोऱ्या रंगाला महत्त्व देणाऱ्या घरातील सारंग यांची जोडी लोकप्रिय आहे. सारंग व सावलीची मैत्री, त्यांना एकमेकांप्रती वाटणारी काळजी, यामुळे ही जोडी दिवसेंदिवस लोकप्रिय ठरताना दिसत आहे.

आता सारंग व सावली यांचे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झाले होते. मात्र, कालांतराने त्यांच्यात मैत्री झाली. आता सावली सारंगच्या प्रेमातही पडल्याचे दिसत आहे. मात्र, सारंग तिला त्याची चांगली मैत्रीण समजतो. आता मात्र सारंग व सावली यांच्यात दुरावा येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीने ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, “तारा व सोहमने लग्न केले आहे. ते लग्न करून मेहेंदळेंच्या घरी आले आहेत. त्यांच्याबरोबर सावलीदेखील आहे. मेहेंदळे कुटुंब एकत्र असल्याचे दिसत आहे. तिलोत्तमा सावलीला विचारते की माझा सोहम कुठे आहे? तितक्यात तिला लग्न करून आलेले तारा व सोहम दिसतात.

सावली सारंगला घटस्फोट देणार?

तिलोत्तमाचा संताप अनावर होतो. ती सावलीला म्हणते, “माझ्या एका मुलाला गिळलंस आणि दुसऱ्या मुलाला खाल्लंस.” प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की सावलीला कोणीतरी सांगते, “सावली तुझ्या घरी आऊट हाऊसमध्ये घटस्फोटाचे पेपर आहेत, त्यावर सही कर आणि त्या सारंगला सोडून दे.” सावली घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करताना दिसत आहे. पेपरवर सह्या केल्यानंतर ती रडत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सावली व सारंगची साथ कायमची तुटणार का?”, अशी कॅप्शन दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे तारा व सोहमचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, ताराच्या आईने भैरवीने तिचे दुसरीकडे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. शेवटी सावलीच्या मदतीने सोहम व ताराचे लग्न होणार असल्याचे दिसत आहे. तसेच काही दिवसांपासून सावलीला कोणीतरी अज्ञात व्यक्ती फोन करून सारंगला इजा पोहोचवणार असल्याच्या धमक्या देत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, सारंग व सावली कायमचे एकमेकांपासून दुरावणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.