‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच तीन नवीन मालिका सुरू होणार आहेत. ‘पारु’, ‘शिवा’, ‘जगद्धात्री’ या तीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यामधील दोन मालिकांचे नवीन प्रोमो प्रदर्शित झाले असून कधीपासून सुरू होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. काल, ‘शिवा’ या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला; जो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

गेल्या महिन्याभरात ‘झी मराठी’च्या तीन मालिका बंद झाल्या. ‘नवा गडी नवं राज्य’, ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘तू चाल पुढं’ या तीन मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण आता लवकरच बंद झालेल्या मालिकांची जागा घ्यायला ‘पारु’, ‘शिवा’, ‘जगद्धात्री’ या तीन मालिका येणार आहेत. ‘शिवा’ या मालिकेचा काल धमाकेदार, दमदार नवा प्रोमो प्रदर्शित झाला. ‘झी मराठी’च्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर हा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. काही नेटकऱ्यांना हा प्रोमो चांगलाच खटकला आहे. ही नवी मालिका सुरू होण्यापूर्वीच कधी बंद होणार? अशी विचारणा केली जात आहे. “भंगाचा पुढचा शब्द काय आहे?”, “छान अजून एक गटार आणली होय”, “मालिका लवकर संपवा”, “दर्जा घसरत आहे”, अशा अनेक प्रतिक्रिया ‘शिवा’ मालिकेच्या नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: अखेर आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शन पार्टीत बॉलीवूडचे ३ खान आले एकत्र, अनेक वर्षांनी दुरावा मिटला

एका नेटकऱ्याने लिहिल आहे, “बरं झालं आम्ही २०२०मध्येच झी मराठी पॅकमधून काढून टाकलं होतं.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “बुद्धीला पटेल अशा तरी मालिका बनवत जा. या मालिका पाहायचं म्हणजे डोकं बाजूला ठेऊन पाहाव्या.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिल, “त्यापेक्षा छोटा भीम बघितलेला बरा.”

हेही वाचा – आमिर खानच्या लेकीचा रिसेप्शन पार्टीतला लेहंगा तयार करायला लागले होते तब्बल ‘इतके’ महिने, डिझायनर म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘शिवा’ ही मालिका ‘सिंदूरा बिंदू’ या ओडिया मालिकेचा रिमेक आहे. याआधी हिंदी भाषेत या मालिकेचा रिमेक झाला होता. ‘मीत’ असं हिंदीतल्या मालिकेचं नाव होतं. त्यानंतर आता लवकरच मराठीत ही मालिका सुरू होत आहे. अभिनेत्री पूर्वा फडके शिवाच्या भूमिकेत झळकणार आहे.