झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेने सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वयाची ३५शी ओलांडलेल्या जोडप्याची कथा या मालिकेमध्ये दाखवण्यात आली आहे. अनामिका-सौरभ या जोडप्याला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. अनामिकाचा पहिला नवरा आकाशची या मालिकेमध्ये एंट्री झाली आणि मालिकेला नवं वळण मिळालं. आता आणखी एक ट्विस्ट मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – Video : मान पकडली, टी-शर्ट खेचलं, बराच वेळ अंगावर बसली अन्…; अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर या मालिकेमध्ये सौरभ आणि अनामिकाची भूमिका साकारत आहे. अनामिकाला घटस्फोट देण्यासाठी तयार नसलेला तिचा पहिला नवरा आकाश सौरभला गायब करतो. पण या सगळ्या गोंधळामध्ये अनामिका व आकाशच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये आकाश-अनामिका पुन्हा लग्न करणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. आकाश एका व्यक्तीचा चेहरा लपवून त्याला खुर्चीमध्ये बांधून ठेवतो. आणि त्याच्यासमोरच अनामिकाबरोबर सात फेरे घ्यायला सुरुवात करतो.

आणखी वाचा – “तुझी नेहमीच आठवण येईल” शरद केळकरच्या ‘त्या’ पोस्टनंतर सेलिब्रिटींनीही वाहिली श्रद्धांजली, नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओमध्ये लग्नाचा मंडप दिसत आहे. रविवारी (६ नोव्हेंबर) प्रदर्शित होणाऱ्या विशेष भागामध्ये अनामिका-आकाशचं लग्न होणार का? सौरभचं पुढे काय होणार? हे दाखवण्यात येणार आहे. प्रेक्षकांना मात्र या मालिकेमध्ये आलेले ट्विस्ट आवडला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मालिकेमध्ये असा ट्विस्ट नको, आम्हाला अनामिका व सौरभचं लग्न पाहायचं आहे असं अनेकांनी म्हटलं आहे.