Zee Marathi New Serial Promo Tula Japanar Ahe : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काळात अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच वाहिनीने ‘लक्ष्मी निवास’ या कौटुंबिक मालिकेची घोषणा केली होती. आता या पाठोपाठ ‘झी मराठी’वर आणखी एक नवीन थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तुला जपणार आहे’ असं या नव्या मालिकेचं नाव असून याची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांसमोर आली आहे.

‘तुला जपणार आहे’ मालिकेचा ( Zee Marathi ) पहिला टीझर काही आठवड्यांआधी लॉन्च करण्यात आला होता. यानंतर या थ्रिलर मालिकेत कोणाची वर्णी लागणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर मालिकेच्या पहिल्या प्रोमोतून प्रमुख भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्रीचा चेहरा रिव्हिल करण्यात आला आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे जाणून घेऊयात…

हेही वाचा : Bigg Boss फेम कलाकारांचा नवीन शो सुरू होणार? छोटा पुढारी घन:श्यामने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे मिळाली हिंट

प्रमुख भूमिकेत कोण झळकणार?

नव्या मालिकेच्या प्रोमोच्या सुरुवातीला अंधाऱ्या रात्री एका बंगल्यात आई आपल्या मुलीसाठी अंगाई गात असल्याचं पाहायला मिळतं. यानंतर लेक लहान असताना तिला कसं खेळवण्यात आलं होतं याचे प्रसंग दिसतात. पण, यानंतर जी आई मुलीला खेळवतेय तिचं आधीच निधन झालेलं आहे, असं प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. यानंतर “दिसत नसले तरी असणार आहे, मी तुला जपणार आहे…!” असं नायिका तिच्या बाळाला म्हणते. यावरून ही मालिका थ्रिलर असेल याचा अंदाज येतो.

नव्या मालिकेत प्रमुख भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर साकारणार आहे. यापूर्वी तिने ‘जिवाची होतिया काहिली’, ‘अंतरपाट’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय प्रशांत दामलेंच्या एका ‘लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकात सुद्धा अभिनेत्री झळकली आहे. आता प्रतीक्षाच्या या नव्या मालिकेकडून प्रेक्षकांच्या मनात देखील प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेची कथा नेमकी काय असेल, यामध्ये अन्य कोणते कलाकार झळकणार याची नावं अद्याप समोर आलेल नाहीयेत.

हेही वाचा : Year Ender 2024: बजेट कमी असूनही गाजवले बॉक्स ऑफिस, यंदा प्रदर्शित झालेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नेटकऱ्यांसह अनेक मराठी कलाकारांनी या ( Zee Marathi ) थ्रिलर प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. लवकरच वाहिनीकडून या मालिकेच्या शुभारंभाची तारीख अन् वेळ जाहीर करण्यात येईल.