Shiva Upcoming Twist: ‘शिवा’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे पूर्वा कौशिक आणि शाल्व किंजवडेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या मालिकेची चर्चा होताना दिसत आहे.

सध्या मालिकेतही विविध घटना घडत असताना दिसत आहेत. सुहास व त्याची आई शिवाला जीवे मारण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. सुहास कीर्तीचा नवरा आहे. सुहासने आशूच्या विरोधात कारस्थान केले होते. ते उघड झाल्यानंतर शिवाने सुहासचा अपमान करून, त्याला मारून घराबाहेर काढले होते. त्याचा बदला घेण्यासाठी सुहास अनेक दिवसांपासून कट-कारस्थान करताना दिसत आहे.

‘शिवा’ मालिकेत पुढे काय होणार?

काही दिवसांपूर्वी त्याने शिवाला मारण्याची योजना बनवली होती. मात्र, त्यांची ही योजना शिवाचा मित्र रॉकीला समजली. शिवाला वाचवण्यासाठी त्याने स्वत:चा जीव पणाला लावला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शिवा व आशूच्या घरावर संकट आल्याचे पाहायला मिळाले. दु:खातून सावरल्यानंतर शिवाला हे समजले की, रॉकीचा मृत्यू अपघाताने झालेला नाही. तर कोणीतरी मुद्दाम तसे घडवून आणले आहे. शिवा शोध घेत असताना त्याबद्दल सुहासला समजले. तो पुन्हा तिच्याविरुद्ध कारस्थान करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीने शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सुहास व त्याच्या आईमध्ये संवाद सुरू आहे. सुहासची आई त्याला म्हणते, “सुहास हे काय होत आहे? सगळी गडबडच होत आहे. एक मार्ग आहे; पण तो वापरायची हीच वेळ आहे का? हे कळत नाहीये. ” त्यावर सुहास म्हणतो की, ती वेळ आलीये समज. शिवाला मारून टाकूया. म्हणजे त्या रॉकीच्या खुन्याचा शोध घेणंही बंद होईल. त्यांचं हे बोलणं कीर्ती दरवाजाबाहेरून ऐकत असल्याचे दिसत आहे. ती आत येते आणि सुहास… असे म्हणते. तिला बघून सुहास व तिच्या आईला धक्का बसतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने, कीर्तीला सुहासचं सत्य समजलं असेल का?, अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, शिवा मालिकेत दाखविल्याप्रमाणे कीर्तीला शिवा आवडत नाही. तिला घरातून बाहेर काढण्यासाठी तिने अनेक कट-कारस्थाने केली आहेत. आता सुहासचे सत्य समजल्यानंतर ती पुढे काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.