Tula Japnar Ahe Serial Promo : ‘तुला जपणार आहे’ ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय भयप्रद मालिका आहे. त्यामध्ये अभिनेत्री महिमा म्हात्रे, नीरज गोस्वामी व प्रतीक्षा शिवणकर मुख्य भूमिका साकारत आहेत. मालिकेत मीरा व अथर्व यांचं लग्न झालं तेव्हा अथर्व व मीरा दोघेही आनंदी नव्हते. पण, आता या दोघांमध्ये जवळीक वाढत असून, दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचं पाहायला मिळतं.
‘तुला जपणार आहे’ मालिकेत माया व मंजिरी यांनी मिळून अंबिकाचा खून केलेला असतो. अंबिकाच्या मृत्यूनंतर मायाला अथर्वबरोबर लग्न करायचं असतं; परंतु त्याचं मीराबरोबर लग्न होतं आणि तोसुद्धा या लग्नापासून नाखूश असतो. माया दुसरीकडे अथर्वला मिळवण्यासाठी कट-कारस्थान करीत असते. परंतु, इतकं सगळं असतानाही मीरा व अथर्व यांच्यातील नातं बहरत असून, ते आता एकमेकांच्या प्रेमात असल्याचं पाहायला मिळतं. एवढंच काय, तर अथर्व दिवाळी पाडव्याला मीराला खास भेटवस्तूसुद्धा देतो.
अथर्व मीराला दिवाळी पाडव्यानिमित्त हिऱ्याची अंगठी भेट म्हणून देतो. ते पाहून मायाला त्रास होतो. अथर्वनं दिलेलं ते गिफ्ट मीराला खूप आवडलेलं असतं. तर अंबिकानं सांगितल्याप्रमाणे मीरासुद्धा त्याला वेदाचे बाबा अशी हाक न मारता अहो, असं म्हणते आणि ते एकून तो आनंदी होतो. मीरा पुढे अथर्वने आणलेली भेट वस्तू घेण्यास नकार देते आणि तिला त्याच्या मनात बायको म्हणून स्थान हवं आहे, असं म्हणते. त्यानंतर अथर्वसुद्धा मीराचे आभार मानत पूर्वीचे गैरसमज आता दूर झाल्याचं सांगतो. परंतु, तिनं व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल त्यानं अजून काही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नसते, असं मालिकेत पाहायला मिळालं. अशातच आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.
अथर्व व्यक्त करेल का मीरावरचं प्रेम?
मालिकेत समोर आलेल्या प्रोमोमध्ये मीरानं घरातील सर्व कुटुंबासमोर अथर्ववरच्या प्रेमाची कबुली देऊनसुद्धा अथर्वनं अजून स्पष्टपणे काही सांगितलं नसल्यानं ती रागावलेली दिसते. अंबिका यासाठी तिची समजूत काढत तिला “मीरा अथर्वला थोडा वेळ देत ते आज न उद्या तुझ्या प्रेमाचा स्वीकार करतील,” असं म्हणते.
मीरा त्यावर “असं नाही होणार” म्हणत तिची व अथर्वची खोलीत असलेली पेंटिंग काढते. त्यानंतर ती “माझं बोलणं झालंय अथर्वशी. त्यांचं प्रेम असेल, तर त्यांनी ते व्यक्त करावं तरच हे नातं पूर्ण होईल,” असं म्हणते. तेवढ्यात तिथे अथर्व येतो आणि तिला हे बोलताना ऐकतो. त्यामुळे आता अखेर अथर्वसुद्धा मीरावरच्या प्रेमाची कबुली देईल का? तोही त्याचं प्रेम व्यक्त करेल का हे मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहायला मिळेल.
