Veen Doghatli Hi Tutena: समर व स्वानंदी आणि रोहन व अधिरा यांचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. गोव्यात हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नाआधीच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

सगळीकडे उत्साहाचे वातावरण असले की समरची काकू मल्लिका आणि तिचा मुलगा अंशुमन या लग्नात विघ्न आणण्यासाठी सतत प्रयत्न करताना दिसत आहेत.

स्वानंदीला मुहूर्तावर चुडा भरला जाणार का?

आता चुड्याच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मल्लिका काकूचे कारस्थान येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. झी मराठी वाहिनीने वीण दोघांतली ही तुटेना मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, स्वानंदीच्या घरी चुडा भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. एक महिला म्हणते की आधी आपण चुड्याची पूजा करून घेऊया.

स्वानंदी नमस्कार करते. स्वानंदीची मैत्रीण म्हणते की, चुड्याच्या आधी एक सोन्याची बांगडी घालावी लागेल ना? स्वानंदीची लहान बहीण म्हणते की, ताईसाठी सोन्याच्या बांगड्या घेतल्या आहेत, मला माहीत नाही त्या कुठे ठेवल्या आहेत; आईला माहीत आहे.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की स्वानंदीची आई सोन्याच्या दुकानात गेली आहे. ती सोन्याच्या दुकानदाराला तिच्याकडील बांगड्या देते. तो त्या बांगड्या तपासून बघत असताना ती सांगते की त्या बांगड्या खऱ्या आहेत. त्या मल्लिका राजवाडे आहेत ना, त्यांनी मला इथे पाठवलं आहे. मल्लिकाने तिला काही बांगड्या देत ते गहाण ठेवण्याचा सल्ला स्वानंदीच्या आईला दिलेला असतो. त्यावर स्वानंदीच्या आईने मल्लिकाने ही तिची कल्पना आहे, हे ती कोणालाही सांगणार नाही असे सांगितलेले असते. दुसरीकडे स्वानंदी तिच्या आईला फोन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आता हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “मुहूर्तावर स्वानंदीला चुडा भरला जाईल का?”, अशी कॅप्शन दिली आहे.

आता मल्लिका पुन्हा स्वानंदीच्या आईवर काही आरोप करणार का, हे लग्न मोडण्यासाठी ती आणखी काय कारस्थान करणार आणि या सगळ्यातून मार्ग काढत स्वानंदी व समर आणि रोहन व अधिरा यांचे लग्न कसे पार पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.