प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते अल्लू रमेश यांचं निधन झालं आहे. ते ५२ वर्षांचे होते. हृदक्रिया बंद पडल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. चित्रपट दिग्दर्शक आनंद रवी यांनी पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांच्या निधनाने तेलुगु चित्रपट सृष्टीवर शोककळी पसरली आहे.

आनंद रवी यांनी सोशल मीडियाद्वारे अल्लू रमेश यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अल्लू रमेश यांच्याबरोबरचा फोटो त्यांनी फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. “पहिल्या दिवसापासूनच तुम्ही मला पाठिंबा दिला. मला अजूनही तुमचा आवाज ऐकू येतोय. तुमच्या निधनामुळे रमेश गुरू यांना धक्का बसला आहे. तुम्ही माझ्यासारख्या अनेक लोकांच्या हृदयात आहात…मिस यू ओम शांती,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
anand-ravi-fb-post

अल्लू रमेश यांचं तेलुगु चित्रपटसृष्टीतील योगदान मोठं आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. २००१मध्ये चिरुजल्लू चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. मधुरा वाइन, वीधी, ब्लेड, बाबजी आणि नेपोलियन यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. माँ विदकुलु या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं होतं.