सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक बड्या चित्रपटांची टक्कर होताना दिसतेय. ‘वेड’ ‘कुत्ते’ आणि ‘वारिस’ हे चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांना घेऊन येण्यासाठी यशस्वी होताना दिसत आहेत. पण या सगळ्यात थलपथी विजयच्या ‘वरिसु’ने पहिल्या पाच दिवसांतच भारतात १०० कोटींचा आकडा गाठला आहे.

थलपथी विजयचा ‘वारिस’ चित्रपट ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. इमोशनल फॅमिली ड्रामा आणि ॲक्शन यांचे मिश्रण असलेल्या या चित्रपटात विजय पुन्हा एकदा पूर्वीच्या अंदाजात दिसून येत आहे. आता या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला मोठाच गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ट्विटरवरही प्रतिक्रिया देत प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. प्रेक्षकांच्या याचं प्रतिसादामुळे या चित्रपटाने भारतात कमाईचा १०० कोटींचा आकडा पार केला आहे.

आणखी वाचा : तिसऱ्या वीकेण्डला ‘वेड’ची दमदार कामगिरी, सुरु केली ५० कोटींकडे वाटचाल

रिपोर्ट्सनुसार, फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. प्रदर्शनाच्या पाच दिवसातच या चित्रपटाने भारतात १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने काल देशभरातून एकूण २४ ते २६ कोटींची कमाई केली. तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. पोंगल, मकर संक्रांत यासारख्या सणांचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाने पहिल्याच विकेंडला भारतातील कमाईचा १०० कोटींचा आकडा पार केला आहे. तर जगभरातून या चित्रपटाने आतापर्यंत १५० कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा : थलपथी विजयच्या ‘वरिसु’चा जगभरात डंका, प्रदर्शनाच्या ३ दिवसांतच ‘इतका’ गल्ला जमवत पार केला १०० कोटींचा आकडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वामशी पेडिपल्ली दिग्दर्शित या चित्रपटात थलपथी विजय एका व्यावसायिकाच्या मुलाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपटगृहात इतर चित्रपटांना चांगलीच टफ फाईट देताना दिसत आहे.