Viral Video: ‘हे पाहिल्यानंतर रजनीकांत आता रुग्णालयात आहेत’, मालिकेतील व्हायरल सीनवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत ट्रोल केलंय.

thapki-payar-ki
(Photo-Instagram@colorstv)

छोट्या पडद्यावरील अनेक हिंदी मालिकांमध्ये बऱ्याचदा कथेमध्ये किंवा दृश्यांमध्ये अतिशयोक्ती दाखवली जाते. यामुळे अनेकदा प्रेक्षकांचा रोषही मालिकेच्या टीमला सहन करावा लागतो. तर कधी सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. सध्या एका मालिकेतील एक सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सीनवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देत ट्रोल केलंय. तसचं मीम्सदेखील तयार करण्यात आले आहेत.

‘थपकी प्यार की २’ या मालिकेतील व्हायरल होणाऱ्या या सीनवर नेटकऱ्यांनी हटके कमेंट केल्या आहेत. या मालिकेतील पात्र थपकी आणि पुरब याचा नुकताच विवाह झाल्याचं दाखवण्यात आलंय. लग्नानंतरच्या एका दृश्यात असं काही दाखवण्यात आलंय की लोकांना हसू आवरणं कठीण होतंय. या दृश्यात पुरबचा पाय घसरतो आणि तो थेट आरशासमोर उभ्या असलेल्य थपकी समोर जातो. एवढचं नाही तर त्याचं बोट नेमकं कुंकवाच्या डबीत पडतं आणि ते बोट क्षणातच थपकीच्या कपाळावर चिकटतं. जेणे करून तिचा भांग कुंकूवाने भरला जातो. हे सारं दृश्य म्हणजे पुरबच्या पाय घसरण्याने अचानक घडून आलेला एक योगायोग दाखवण्यात आलाय. मात्र प्रत्यक्षात हे दृश्य पाहता असा योगायोग प्रत्यक्षात घडणं कधीच शक्य नसल्याचं कोणत्याही सामान्य व्यक्तीला पटेल. त्यामुळे नेटकऱ्यांकडून या दृश्याची खिल्ली उडवली जातं आहे. हा व्हिडीओ व्हायलर होत असून नेटकऱ्यांनी विनोदी कमेंट केल्या आहेत.

“मोती साबणाने अंघोळ केल्यानंतर आरशात पाहताना”, बोल्ड फोटो शेअर करत तेजस्विनीने दिलं हटके कॅप्शन

. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत ट्रोल केलंय. एक युजर म्हणाला ‘मिशन इम्पॉसिबल’ तर दुसरा युजर म्हणाला, “हे पाहिल्यानंतर रजनीकांत आता रुग्णालयात आहेत”. आणखी एक नेटकरी म्हणाला, “हा मूर्खपणाचा कळस आहे”.

“मला ते भाग्य लाभलं”; शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्ताने करण जोहरने शेअर केली खास पोस्ट


एवढचं नव्हे तर या शोमध्ये अशी अनेक दृश्य दाखवण्यात आल्याने नेटकरी भन्नाट कमेंट करत आहेत. “अजून एक चमत्कार” असं म्हणत एका नेटकऱ्याने मालिकेत आणखी एक भन्नाट सीन शेअर केलाय. हा या मालिकेचा दुसरा सिझन आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thapki payar ki serial viral video netizens make funny comment kpw