‘द कपिल शर्मा शो’ शो सोडून जाण्यावर का अर्चना पुरण सिंग ?

द कपिल शर्मा शोच्या परिक्ष अर्चना सिंग या शो सोडून जाण्याची चर्चा बरेच दिवस रंगत आहे, आता अर्चना यांनी या अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे.

archana-singh-instagram
(Photo-Archan puran Singh Instagram)

छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. आजवर या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम पाहण्यासाठी विदेशातील काही प्रेक्षकांनी देखील हजेरी लावल्याचं पाहायला मिळाले . करोना लॉकडाउनचा फटका या कार्यक्रमाला बसला होता. त्यामूळेच शो बंद झाला होता. पण लवकरच हा कार्येक्रम छोट्या पडद्यावर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कार्यक्रमाची परतीची बातमी कळताच एक चर्चा रंगू लागली आहे. ते म्हणजे शोच्या स्पेशल परिक्षक अर्चना पुरण सिंग शो सोडणार का ? या प्रश्नाला उत्तर देत अर्चना यांनी मोठा खुलासा केला आहे.

अर्चना यांनी इ-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये बातम्या कोठ्या असल्याचे सांगतले आहे .त्या म्हणाल्या “मागच्यावेळी पण मी एका सीरिजच्या चित्रीकरणाच्या वेळी आशाच चर्चा रंगल्या होत्या. या वेळी देखील तेसेच झाले. पण मी कपिल शर्मा शोच्या अगामी पर्वात आहे. मी हा कार्यक्रम सोडणार आहे यात काहीच तथ्य नाही”.

कार्यक्रमाबद्दल बोलताना त्या पुढे सांगतात. “मला हा शो प्रचंड आवडतो. या शोसाठी कपिलने मला निवडल्याचा मला फार आनंद झालाय. “आपण शोच शुटिंग सुरू होण्याची वाट बघत असल्याचेही त्यांनी त्या मुलाखतीत सांगितले. अर्चना यांनी हे ही सांगितले की त्यांच्या मुलांना पण चित्रपट क्षेत्रात पदार्पण करायचे आहे. त्या सांगतात “दोघही प्रचंड मेहनत घेत आहेत. कलाकारांच्या मुलांना काम पटकन मिळते असं म्हणं सोपं आहे. मी जरी या क्षेत्रात काम करत असले तरी ते स्वबळावर काम मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आर्यमान आणि आयुष्मान दोघही मेहनत घेत आहेत. आणि या गोष्टिचा माला अभिमान आहे. लवकरच ते या क्षेत्रात पदार्पण करतील ही प्रथना करते” आशय अश्याचे अर्चना यांनी मुलाखतीत सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The kapil sharma show archana puran singh openup about quitting

ताज्या बातम्या