छोट्या पडद्यावरील ‘कपिल शर्मा शो’ हा लोकप्रिय शोपैकी एक आहे. या शोमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार हजेरी लावतात. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि पती करण सिंह ग्रोवरने हजेरी लावणार आहेत. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने ते दोघे कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणार आहेत. या दोघांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शोमध्ये हे बिपाशा डान्स करते तर करण सिंग ग्रोव्हर त्याच्या फिटनेटविषयी सांगतो. याशिवाय ते त्यांच्या पर्सनल लाइफ विषयी देखील सांगतात. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये कपिल करण सिंह ग्रोवर आणि बिपाशाला त्यांच्या रोमॅन्टिक आणि लग्नाच्या आयुष्यातील काही सीक्रेट्स विचारतो. त्यावर ते दोघे ही मजेशीर उत्तर देतात. बिपाशा आणि करण यांचे स्वागत करत कपिल ‘जादू है नशा है’ हे गाणं गातो. त्या दोघांची रोमॅन्टिक एण्ट्री होते. “तुम्ही दोघंही १० वर्षांपूर्वी आणि आजही तेवढेच फीट आणि सुंदर दिसत आहात. हे ते लोक आहेत जे त्यांच्या हनिमूनला दुधाऐवजी प्रोटीन शेक पिऊन झोपतात.”

आणखी वाचा : “अपमानानंतरही अक्षय कुमार जर कपिल शर्मा शोमध्ये आला तर मी…”, अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत

आणखी वाचा : “ट्रेनमधून उडी मारायची इच्छा व्हायची…”, मृणाल ठाकूरने केला धक्कादायक खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रोमोमध्ये अर्चना पूर्णा सिंह त्या दोघांना विचारते, “तुमच्या दोघांमध्ये भांडण कोणत्या गोष्टीवरून होतं?” यावर करण म्हणतो, “जेव्हा मी चूक करतो, पण मी नेहमीच नवीन चूक करतो.” तर बिपासा बोलते, “मी भांडत नाही. मी फक्त सांगते. तर यावर करण म्हणाला, हो, ती भांडत नाही, फक्त ओरडते.” तेव्हा कपिल शर्मा म्हणतो, “मग तुला काय त्याला हंटर मारायचे आहे का?”