‘द कश्मीर फाईल्स’ या वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित झाला होता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आणि करोनाच्या साथीनंतर अशी कामगिरी करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. काहींनी या चित्रपटाचं कौतुक केलं होतं तर काहींनी यावर टीकाही केली. अशात आता पल्लवी जोशी यांनी बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशावर भाष्य केले आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत पल्लवी जोशी यांनी बॉलिवूड कुठे चुकतंय यावर भाष्य केलं. पल्लवी म्हणाल्या, “मी बॉलीवूडमध्ये तज्ञ नाही, त्यामुळे ‘शमशेरा’ किंवा ‘दोबारा’ किंवा इतर चित्रपटांमध्ये काय चूक झाली हे मला माहीत नाही. पण आमच्या चित्रपटासाठी कोणत्या बाजू जमेच्या ठरल्या हे मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते.”
आणखी वाचा- विल स्मिथच्या वागण्यावर क्रिस रॉकने लगावला टोला, म्हणाला “त्याने माझ्या आयुष्यातल्या…”

पल्लवी जोशी पुढे म्हणाल्या, “माझा विश्वास आहे की, तुम्ही तुमचा विषय किंवा परफॉर्मन्स लोकांसमोर सादर करता त्यावेळी तुमचा हेतू काय आहे याची जाणीव प्रेक्षकांना होत असते. मी जेव्हा रंगमंचावर काम करायचे त्यावेळच्या अनुभवांवरून सांगते जेव्हा माझं कामावर लक्ष नसायचं तेव्हा प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसे. हीच गोष्ट चित्रपटांनाही लागू होते. पडद्यावर तुमचं काम पाहिल्यानंतर लोकांना तुमचा प्रामाणिकपणा कळतो.

आणखी वाचा- काश्मीर फाईल्स ऑस्करला जाणार का? पल्लवी जोशी म्हणाल्या, “चित्रपटाकडे केवळ…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पल्लवी जोशी यांच्या मते, ‘द काश्मीर फाईल्स’ला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं कारण चित्रपटात देशातल्या अशा समस्यांचं चित्रण होतं ज्या लोकांना पाहायच्या होत्या. जे बहुतांश चित्रपटांनी दाखवणं टाळलं होतं. त्या पुढे म्हणाल्या, ‘कलाकार म्हणून ज्ञान हे समाजाला आरसा दाखवण्याचे साधन असते. तुम्ही थोडेसे सत्तेच्या विरोधात असाल तरीही तुम्ही तुमचं काम योग्य प्रकारे करत असता तेव्हा अपेक्षित प्रतिसादही मिळतो. राज कपूर, सुनील दत्त, मनोज कुमार यांचे चित्रपट पाहिले तर त्यांनी समाजात जे काही चालले आहे तेच आपल्या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला होता.