The Kerala Story Actress Adah Sharma Video: सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित होताच यावर टीका होताना दिसत आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर खासदार शशी थरूर यांनी सुद्धा पुरावे देण्यास सांगितले आहे. केरळमधील मुस्लिम संघटनांनी दावे सिद्ध केल्यास १ कोटी देण्याचे चॅलेंज दिले आहे. द केरळ स्टोरीच्या निमित्ताने अभिनेत्री अदा शर्मा सुद्धा चर्चेत आली आहे. पण चित्रपटाला होणाऱ्या टीकांमध्येही अदाच्या काही व्हिडीओजला भरभरून प्रेम मिळतंय. विशेषतः मराठी प्रेक्षकतर अदाच्या अदा बघून फिदा झालेत म्हणायला हरकत नाही.

अभिनेत्री अदा शर्मा हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही कविता म्हणतानाचे व्हिडीओ शेअर केले होते. यात ती चक्क शुद्ध मराठीत कविता म्हणत आहे. बरं या कविताही साध्या नसून प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर केलेल्या आहेत. कविता म्हणण्यापेक्षा यांना बडबडगीते म्हणणे अधिक योग्य ठरेल. अदाने अगदी गोड अंदाजात तिच्या अकाऊंटवर दोन मराठी कवितांचे व्हिडीओ शेअर केले होते, ज्याला मराठी माणसांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. तुम्हीही हे व्हिडीओ पाहिले नसतील तर आता पाहूया…

अदा शर्मा इंस्टाग्राम Video

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अदाच्या या व्हिडीओजवर मिलियनच्या घरात व्ह्यूज आहेत. तसेच अनेकांनी यावर कमेंट करून तुझे मराठी शब्दांचे उच्चार किती स्पष्ट आहेत असेही म्हंटले आहे. तसेच तुझया आवाजात गोडवा आहे आणि मराठी भाषेत तर तो आणखी खिळून दिसतोय, कोणीतरी हिची नजर काढायला हवी अशा कमेंट्सचा अदाच्या पोस्टवर पुरच आला आहे. तुम्हाला तिचा हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून कळवा.