सरबजीत या चित्रपटाच्या प्रिमियरवेळी अभिषेक रेड कार्पेटवरून ऐश्वर्याला मध्येच सोडून गेला आणि चर्चांना उधाण आले. गेले काही महिने बॉलीवूडमध्ये घटस्फोटाच्या बातम्या वाढल्याने अजून एक घटस्फोटाची बातमी कानावर येते की काय असेही सर्वांना वाटत होते. अभिषेक हा नेहमी ऐश्वर्याच्या पाठीशी उभा असतो. पण सरबजीतच्या प्रिमियरला अभिषेक ऐश्वर्याला मध्येच सोडून गेल्याने उपस्थितांना धक्का बसला. तेव्हापासून अभिषेकचं ऐश्वर्याशी नक्की काय बिनसलं यावरचं चर्चा होती.
प्रिमियरच्या आधी या दोघांमध्ये काही वाद झाला आणि त्यामुळे अभिषेक ऐश्वर्याशी असा वागल्याचे म्हटले जात आहे. त्यावर मिसमालिनी या वेबपोर्टलने या दोघांच्या निकटवर्तीयाशी संवाद साधला असता त्याने म्हटले की, या दोघांमध्ये कोणताही वाद नाही. अभिषेक आणि ऐश्वर्या हे दोघेही सुरक्षित वागणा-या लोकांपैकी आहेत. सरबजीत हा ऐश्वर्याचा चित्रपट असून, रेड कार्पेटवर झळकण्याचा तो तिचा दिवस होता. त्यामुळे अभिषेकला कुठेही सेंटर स्टेज होऊन सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे नव्हते. बच्चन कुटुंबिय हे केवळ ऐश्वर्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे त्यावेळी अभिषेक स्टेज सोडून तिथून निघून गेला.
सरबजीतच्या प्रिमियरला काय घडले
नुकत्याच झालेल्या ‘सरबजीत’ या सिनेमाच्या प्रिमिअरवेळी या दोघांत काहीतरी बिनसल्याचे दिसून आले. सरबजीतच्या प्रिमियरला जेव्हा पत्रकारांनी या जोडप्याला एकत्र फोटो काढण्याची विनंती केली. तेव्हा ऐश्वर्याने अभिषेकला बोलविण्याचा प्रयत्न केला पण त्याने काही ओह दिली नाही. शेवटी ऐश्वर्याचा भाऊ आदित्य राय याने अभिषेकला ऐश्वर्या बोलावत असल्याचे सांगितले. नंतर ऐश्वर्याने अभिषेकला हात पकडून फोटो काढण्यासाठी बोलावले. पण त्याच्या चेहऱयावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. ऐश्वर्याच्या भावाच्या आणि वडिलांच्या सांगण्यावरून अभिषेकने ऐश्वर्यासोबत एक-दोन फोटो काढले पण त्यानंतर ऐश्वर्यासोबत काही फोटो काढल्यानंतर अभिषेक म्हणाला, ‘हिचेच फोटो काढा’ आणि तिथून निघून गेला.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2016 रोजी प्रकाशित
.. म्हणून अभिषेक ऐश्वर्याला सोडून निघून गेला
ऐश्वर्याने अभिषेकला बोलविण्याचा प्रयत्न केला पण त्याने काही ओह दिली नाही.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 21-05-2016 at 13:14 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The real reason why abhishek bachchan left aishwarya rai at the red carpet