साजिद नाडियाडवाला यांचा ‘बच्चन पांडे’ या चित्रपताटली ‘मार खाएगा’ आणि ‘मेरी जान’ ही दोन गाणी रिलीज झाली आहेत. या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अशातच आता या चित्रपटतील तिसरे गाणेही प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे नाव ‘सारे बोलो बेवफ़ा’ असे आहे. ‘बच्चन पांडे’ हा एक अ‍ॅक्शन विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘सारे बोलो बेवफ़ा’ या गाण्यात अक्षय कुमार नेहमी प्रमाणेच आपला स्वॅग आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या गाण्यात बच्चन पांडेच्या अवतारातील मुख्य नायक अक्षय कुमारचा अभिनय आणि शैली वेगळ्या उर्जेसह त्याला पूर्णपणे वेगळ्या पातळीवर घेऊन जाते. जानी यांनी संगीतबद्ध केलेले आणि लिहिलेले, तर बी प्राक यांनी गायलेल्या या गाण्याला देसी शैलीत सादर करण्यात आले असून अक्षय आणि त्याच्या टीमने उर्वरित गाण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह ‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त; म्हणाले, “मी कधीही…”

या गाण्यात अक्षय कुमार एका भयानक अवतारात दिसत आहे. अक्षय कुमारची स्टाइल पाहून तुम्ही हसालही आणि घाबरूनही जाल. अक्षयसोबत या गाण्यात अभिनेता अभिमन्यू सिंगनेही चांगलं काम केलं आहे. तसेच, या गाण्यात क्रिती सेनन आणि अर्शद वारसी मस्ती करताना दिसत आहेत. अक्षय कुमारसोबत इतर सर्वजण जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. हे गाणे खूप मजेदार आहे आणि ते पाहताना आणि ऐकताना तुम्हालाही नाचावेसे वाटेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फरहाद सामजी दिग्दर्शित, अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’चा ट्रेलर रिलीज झाल्यावर लगेचच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटात क्रिती सेनन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग आणि जॅकलीन फर्नांडिस यांनी भूमिका साकारल्या आहेत. ‘बच्चन पांडे’ १८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.