बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने अनेक अॅक्शन सीन्स देखील दिले आहेत. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘खिलाडीयो का खिलाडी.’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री रविना टंडन मुख्य भूमिकेत दिसली होती. पण चित्रपटातील एक अॅक्शन सीन चर्चेत होता. या सीनमध्ये अक्षय आणि डब्लूडब्लूईमधील खिलाडी द अंडरटेकर यांच्यामध्ये फाईट दाखवण्यात आली होती.
‘खिलाडीयो का खिलाडी’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे अक्षय कुमारने एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने खऱ्या अंडरटेकरशी फाइट झाली नसल्याचे सांगितले होते. या सीनमध्ये बायन लीने द अंडरटेकरची भूमिका साकारली होती. अक्षयने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो कोलाज शेअर केले आहे. यामध्ये त्याने तुम्ही कधी अंडरटेकरला हरवले असेल तर हात वर करा असे म्हटले आहे. यामध्ये अक्षयने स्वत:चा फोटो वापरला आहे.
आणखी वाचा : नोराचा अनोखा बिकिनी लूक पाहून वरुण धवनला हसू अनावर, पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
अक्षय कुमारची ही पोस्ट पाहून खऱ्याखुऱ्या अंडरटेकरने कमेंट करत अक्षयला आव्हान केले आहे. ‘जेव्हा खऱ्या मॅचसाठी तयार होशील तेव्हा सांग’ असे अंडरटेकरने म्हटले आहे. त्यावर अक्षयने मजेशीर अंदाजात उत्तर दिले आहे. ‘मला माझा इंश्युरन्स चेक करु दे आणि मग सांगतो’ असे अक्षय म्हणाला आहे.
अक्षयचा लवकरच ‘बेल बॉटम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या वर्षात एकापेक्षा एक हिट चित्रपट देण्यास तयार आहे. येत्या काळात ‘सूर्यवंशी’, ‘पृथ्वी राज’, ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ ‘धूम 4’ आणि ‘बेल बॉटम’ हे त्याचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.