मॉडेलिंग विश्वातून अभिनय क्षेत्रात येणाऱ्या अभिनेत्री लिसा हेडन या नावाला अनेकांची पसंती आहे. अभिनयासोबतच लिसा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी लिसाने एक पोस्ट शेअर करत तिच्या गरोदरपणाची गुडन्यूज दिली आहे. लिसाने नुकताच तिच्या बेबी बंपसोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
लिसाने तिचा हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत लिसाने राखाडी रंगाचा जमसुट परिधान केला असून ती तिचे बेबी बंप दाखवत आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष लिसाच्या कॅप्शनने वेधले आहे. “कधीकधी मला खात्री पटत नाही की खरोखर बाळ किती वाढत आहे आणि पिझ्झा किती आहे.” असे कॅप्शन लिसाने त्या फोटोला दिले आहे. लिसाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोला १ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.
View this post on Instagram
लिसाचा जन्म चेन्नईत झाला आहे. मात्र, तिचे बहुतेक आयुष्य हे भारताबाहेरच गेले आहे. मुंबईत मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी येण्यापूर्वी ती ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथे वास्तव्यास होती. मॉडेलिंगनंतर तिने चित्रपटसृष्टीकडे धाव घेतली. ‘हाऊसफुल्ल ३’, ‘द शौकीन्स’, ‘क्वीन’, ‘रास्कल्स’ आणि ‘आयशा’ या चित्रपटांमध्ये लिसाने काम केले आहे.