बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याचा आगमी चित्रपट ‘जर्सी’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण चंदिगढ येथे सुरु आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शाहिद जखमी झाला असून त्याला १३ टाके पडले आहेत.

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, काल संध्याकाळपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण सुरळीत सुरु होते. त्यानंतर शाहिद त्याचा क्रिकेटशी संबंधती शॉट देण्यासाठी तेथे आला. पण काही वेळानंतर क्रिकेट खेळत असताना शाहिदच्या डोक्याला चेंडू लागला आणि तो जखमी झाला. त्यानंतर तातडीने शाहिदला चंदिगढ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु असून शाहिदच्या डोक्याला १३ टाके पडल्याचे समोर आले.

 

View this post on Instagram

 

#jersey #prep

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

सूत्रांच्या माहितीनुसार आता शाहिदची प्रकृती ठिक असून तो पूर्णपणे ठिक होईपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. शाहिद जखमी झाल्याची माहिती मिळताच शाहिदची पत्नी मिरा राजपूतने चंदिगढला धाव घेतली.

‘जर्सी’ हा तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौथम तिन्नानूरी यांनी केले असून हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही तेच करत आहेत. ‘जर्सी’ चित्रपटाचा हिंदी रिमेक २८ ऑगस्ट २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली होती. तसेच शाहिदने या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये मानधन घेतले असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले होते.