सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमुरच्या पहिल्या वाढदिवसाबद्दल अनेकांनाच उत्सुकता होती. २० डिसेंबरला वडिलोपार्जित पतौडी पॅलेसमध्ये तैमुरचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला. कपूर आणि खान कुटुंबातील काही मोजके लोक तेथे उपस्थित होते. मात्र, या सेलिब्रेशनला सैफची मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम का गैरहजर होते, असा प्रश्न अनेकांनाच पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची सारा आणि इब्राहिम ही मुलं आहेत. सारा आणि इब्राहिमची करिनाशी चांगलीच मैत्री असून अनेकदा पार्ट्यांमध्येही ते एकत्र दिसतात. त्यामुळे तैमुरच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रश्न निर्माण झाले. ‘पिंकविला’ वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार सारा अली खान तिच्या बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट ‘केदारनाथ’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. हा तिचा पहिलाच चित्रपट असल्याने दिग्दर्शक शूटिंगपूर्वी काही वर्कशॉप आणि सराव तिच्याकडून करून घेत आहेत. याच कारणामुळे ती पतौडी पॅलेसला जाऊ शकली नाही. तर शिक्षणासाठी लंडनमध्ये असलेला इब्राहिम ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये मुंबईला आला आहे. पण आई आणि बहिणीसोबत वेळ घालवण्यास त्याने प्राधान्य दिलं.

वाचा : कृष्ण की कर्ण? ड्रीम प्रोजेक्टमधील भुमिकेबाबत आमिर खान संभ्रमात

सारा आणि इब्राहिम जरी तैमुरच्या वाढदिवसाला हजर राहू शकले नसले तरी सैफ- करिनाने रविवारी आयोजित केलेल्या ख्रिसमस पार्टीला मात्र ते आवर्जून उपस्थित होते. वांद्रे इथल्या घरी झालेल्या या पार्टीला करिश्मा कपूर, संदीप तोष्णीवाल, सोहा आणि कुणालसुद्धा हजर होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is why saif ali khan children sara and ibrahim did not attend taimur birthday party
First published on: 26-12-2017 at 15:35 IST