९ सप्टेंबर रोजी ‘ब्रह्मास्त्र’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, मौनी रॉय हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाला बऱ्याच कारणांमुळे विरोध होत आहे. रणबीर आणि आलियाची वक्तव्यं आणि एकंदरच प्रेक्षकांचा असलेला बॉलिवूडवर राग यामुळे ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ कायम ट्रेंड होत आहे. हा चित्रपट ३ भागात येणार असून त्याचा पाहिला भाग यावर्षी येणार आहे. अजून पहिला भाग प्रदर्शितदेखील झाला नसताना याच्या दुसऱ्या भागाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

‘ब्रह्मास्त्र २ – देव’ या चित्रपटासाठी हृतिक रोशनला विचारण्यात आलं होतं अशी चर्चा बाहेर होत आहे. पण नुकतंच याबद्दल खुलासा झाला आहे. हृतिकने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. हृतिकवर कामाचा ताण खूप असल्याने त्याने या दुसऱ्या भागासाठी नकार दिला आहे.

हृतिककडे सध्या २ मोठे खर्चीक चित्रपट आहेत, एक म्हणजे ‘क्रिश ४’ आणि दूसरा म्हणजे ‘रामायण’. अर्थात या दोन्ही चित्रपटांबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या दोन्ही चित्रपटांसाठी वेळ आणि पैसा खूप खर्च होणार आहे आणि अशातच ब्रह्मास्त्रसारखा चित्रपट स्वीकारणं हृतिकसाठी अवघड दिसतंय. ब्रह्मास्त्रसारख्या चित्रपटाला सर्वात जास्त वेळ द्यावा लागणार असल्याने हृतिकने हा चित्रपट नाकारला असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : “न्यायव्यवस्थेने पुन्हा काश्मिरी पंडितांना…” कोर्टाच्या सुनावणीनंतर विवेक अग्निहोत्री यांचं ट्वीट व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता यामागे नेमकं हेच कारण आहे की बॉयकॉट ट्रेंडमुळे हृतिक नाही म्हणाला आहे यावर तूर्तास काहीच स्पष्टीकरण आलेलं नाही. सध्या हृतिक त्याच्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. विक्रम वेधाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून लोकांना या चित्रपटाकडून अपेक्षा आहेत, हृतिकबरोबर यामध्ये सैफ अली खानसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. ९ सप्टेंबरला ‘ब्रह्मास्त्र’ आणि महिन्याच्या शेवटी म्हणजेच ३० सप्टेंबरला ‘विक्रम वेधा’ प्रदर्शित होणार आहेत.