scorecardresearch

PHOTOS: प्रेयसी दिशासाठी टायगर सरसावला

दिशाला चालताना काठीचा आधार घ्यावा लागलाय

PHOTOS: प्रेयसी दिशासाठी टायगर सरसावला

अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याची कथित प्रेयसी दिशा पटानी यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दिसतं की दिशाच्या पायाला दुखापत झालीये आणि तिला चालण्यासाठी टायगर सहाय्य करताना दिसतो. दिशाच्या मॅनेजरने सांगितले की, एका डान्स प्रॅक्टीस दरम्यान तिच्या पायाला दुखापत झाली. यामुळे दिशाला चालताना काठीचा आधार घ्यावा लागलाय.

Jab Harry Met Sejal Mini Trail 5: होणाऱ्या नवऱ्याने दिलेली अंगठी अनुष्काने हरवली?

दिशाच्या या कठीण प्रसंगी टायगरने तिला केलेली मदत पाहून त्या दोघांमध्ये खरेच काही आहे का असा प्रश्न पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. अजूनपर्यंत टायगर आणि दिशाने आपले नाते हे फक्त मैत्रीपूर्णच असल्याचे मान्य केले आहे. या नात्याला त्यांनी अजून दुसरं कोणतही नाव दिलेलं नाही. पण टायगर- दिशाच्या चाहत्यांना हे दोघं लग्न कधी करणार याची उत्सुकता लागली आहे.

tigher-disha-620x400

tiger-shroff-and-disha-patani-1-1

tiger-shroff-and-disha-patani-9-1

tiger-shroff-and-disha-patani-8-1

tiger-shroff-and-disha-patani-5-2

tiger-shroff-and-disha-patani-4-1

नव्या दमाची अभिनेत्री म्हणून दिशा पटानीकडे पाहिले जाते. २०१६ मध्ये आलेल्या ‘धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये तिने दमदार पदार्पण केले होते. तिचे सौंदर्य आणि डान्स या दोन गोष्टींनी तिने कित्येकांना घायाळ केले आहे. अनेक हॉट फोटोशूटसाठीही ती नेहमीच चर्चेत असते. दिशा अनेक मासिकांच्या कव्हर फोटोवरही झळकली आहे. काही दिवसांपूर्वी दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉलिवूड स्टार पेनेलोप क्रूझसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोत दिशा हुबेहुब पेनेलोपसारखीच दिसत होती.

‘कुंग फू योगा’ या सिनेमात दिशा शेवटची दिसली होती. या सिनेमात ती सुपस्टार जॅकी चॅनसोबत दिसली होती. दिशा अनेकदा टायगरसोबत लंच किंवा डिनरला जाताना दिसते. ‘बागी २’ या आगामी सिनेमात ही जोडी एकत्र दिसणार आहे. टायगरच्या ‘बागी’ या सिनेमाचाच हा सिक्वल असणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tiger shroff and disha patani new pics are creating headlines in bollywood media

ताज्या बातम्या