scorecardresearch

‘या’ अभिनेत्रीमुळे झालंय दिशा- टायगरचं ब्रेकअप? अभिनेत्याशी अफेअरच्या चर्चांना उधाण

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीच्या ब्रेकअपची बरीच चर्चा आहे.

‘या’ अभिनेत्रीमुळे झालंय दिशा- टायगरचं ब्रेकअप? अभिनेत्याशी अफेअरच्या चर्चांना उधाण
टायगरच्या आयुष्यात नव्या अभिनेत्रीची एंट्री झाल्याची चर्चा आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांच्या ब्रेकअपची बरीच चर्चा झाली होती. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ वर्षाच्या सुरुवातीलाच वेगळे झाले होते. दिशाला टायगरशी लग्न करायचं होतं मात्र तो यासाठी तयार नव्हता त्यामुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं. अर्थात या दोघांनीही ब्रेकअपवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अशातच आता टायगरच्या आयुष्यात नव्या अभिनेत्रीची एंट्री झाल्याची चर्चा आहे.

दिशा पाटनीशी ब्रेकअप झाल्यानंतर टायगर श्रॉफ आता अभिनेत्री आकांक्षा शर्माला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. आकांक्षा शर्मा आणि टायगर यांनी ‘कॅसेनोवा’ आणि ‘आई एम ए डिस्को डान्सर २.०’ अशा दोन गाण्यांसाठी एकत्र काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत टायगर श्रॉफने आकांक्षाला डेट करत नसल्याचं म्हटलं होतं. पण बी-टाऊनमध्ये मात्र या दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे.
आणखी वाचा- “खूप काही सांगायचं राहून गेलं…” मावशीच्या निधनानंतर अमृता खानविलकरची भावूक पोस्ट

‘ई-टाइम्स’च्या वृत्तामध्ये आकांक्षा शर्मा ही टायगर- दिशाच्या ब्रेकअपचं कारण नसल्याचा दावा करण्यात आला असला तरीही आकांक्षा शर्मामुळेच टायगर आणि दिशाचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टायगर आणि आकांक्षा सुरुवातीपासून एकामेकांचे चांगले मित्र होते. मात्र दिशाशी ब्रेकअप झाल्यानंतर या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे. काही रिपोर्टनुसार टायगर आणि आकांक्षा एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

आणखी वाचा- “मुलाच्या लव्ह लाइफमध्ये मी…” टायगर- दिशाच्या ब्रेकअपवर जॅकी श्रॉफ यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान मागच्या महिन्यात एका पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार टायगर श्रॉफने दिशा पाटनीशी लग्न करण्यास नकार दिल्यानंतर दोघंही वेगळे झाले. दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ मागच्या बऱ्याच वर्षांपासून एकत्र राहत होते. दिशाचं टायगरच्या कुटुंबियांशीही खास बॉन्डिंग आहे. बरीच वर्ष एकमेकांसोबत राहिल्यानंतर दिशा पाटनी टायगरशी लग्न करण्याच्या विचारात होती. मात्र टायगरनं याला नकार दिल्याचं बोललं जातंय.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tiger shroff disha patani breakup actress akanksha sharma is the reason of it mrj

ताज्या बातम्या