या सिनेमात सलमान दिसेल चक्क ७० वर्षांचा म्हातारा

या सिक्वलमध्ये सलमान एका ७० वर्षीय माणसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे

कबीर खानचा हिट सिनेमा ‘एक था टायगर’च्या सिक्वलमध्ये बॉलिवूडचा दबंग खान परत एकदा दिसणार आहे. या सिनेमाचे नाव असेल ‘टायगर जिंदा है’. सिनेमाचे प्रदर्शन २०१७ च्या नाताळमध्ये करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. या सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यात सलमान आधीच्या सिनेमात जसा दाखवण्यात आला होता अगदी त्याचप्रकारे आताही दाखवण्यात आला आहे. पण या सिक्वलमध्ये सलमान एका ७० वर्षीय माणसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. यामुळे या सिनेमात सलमान म्हाताऱ्या टायगरची भूमिका साकारु शकतो. या सिनेमात त्याची ही व्यक्तिरेखा पाहणे अधिक औत्सुक्याचे असेल. कारण सुलतानमध्ये ३०-४० वर्षीय पेहलवानाची व्यक्तिरेखाही त्याने याआधी साकारली आहे. जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

या सिनेमाचे दिग्दर्शन यावेळी कबीर खान करत नाहिए. अली अब्बास जफरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे. ‘एक था टायगर’मध्ये ‘रॉ’चा गुप्तहेर आणि पाकिस्तानी ‘आयएसआय’ एजंट झोया यांची प्रेम कहाणी दाखवण्यात आली होती. सिनेमात यावेळीही कतरिना एका पाकिस्तानी एजंटच्या भूमिकेत असणार आहे. ‘टायगर जिंदा है’ सिनेमाच्या पोस्टरवर “there will be peace” अशी आकर्षक टॅग लाइनही दिसत आहे. सलमान सध्या त्याच्या ‘ट्युबलाइट’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. उत्तर भारतात या सिनेमाचे शुटिंग सुरु आहे.

tiger-zinda-hai

या सिनेमाची शुटिंग मनालीमध्ये सुरु आहे. शुटचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सिनेमात सलमानचा लूक मात्र खूपच साधा दाखवण्यात आला आहे. शुटिंगचे हे फोटो साधारणतः मंगळवारी रात्री उशीरा व्हायरल झाले. या फोटोमध्ये सलमान शर्टवर चॉकलेटी रंगाचे स्वेटर घातलेले आहे. सलमानची शुटिंग पाहायला आलेल्या आपल्या फॅन्सना हात हलवताना दिसत आहे. सलमानचा हा लूक २०१५ मध्ये आलेला ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमाची आठवण करुन दिल्याशिवाय राहत नाही.

याआधी या सिनेमाचा दिग्दर्शक कबीर खानने लडाखमध्ये झालेल्या शुटिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये सलमान एका सैनिकाच्या भूमिकेत दिसत आहे. या सिनेमात एक चिनी अभिनेत्रीही काम करणार आहे. चीनी अभिनेत्री झू झूने याआधी हॉलिवूडच्या नावाजलेल्या कलाकारांबरोबरही काम केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tiger zinda hai movie the squeal of ek tha tiger will be casting salman khan and katrina kaif again

ताज्या बातम्या