या वर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमा म्हणून ‘टायगर जिंदा है’ सिनेमाकडे पाहिले जात आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमातील एका गाण्याचे चित्रीकरण सध्या ग्रीसमध्ये सुरू आहे. कतरिनावर चित्रित होणाऱ्या या गाण्याचे काही फोटो लीक झाले आहेत. लीक झालेल्या या फोटोंमध्ये कतरिनाचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे. या सिनेमाची आतापर्यंत जेवढी चर्चा झालेय त्याचे मुख्य कारण कतरिनाच राहिली आहे. तिचा या सिनेमातील लूक पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.
काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा क्लायमॅक्स लीक झाल्याची बातमीही प्रसिद्ध झाली होती. या सिनेमात सलमान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीसोबतच अफलातून स्टंटबाजीसुद्धा पाहता येणार आहे, असंच म्हणावं लागेल. या सिनेमातील साहसदृश्यं अधिक प्रभावी करण्यासाठी अॅक्शन डिरेक्टर टॉम स्ट्रथर्स यांना पाचारण करण्यात आलं आहे. या सिनेमासाठी सलमानने घोडेस्वारीचंही प्रशिक्षणही घेतले.
सलमानसोबतच कतरिनानेही या सिनेमासाठी विशेष मेहनत घेतली आहे. तिने सिनेमाचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी मशीनगन चालवण्यापासून ते तलवारबाजीपर्यंतचे प्रशिक्षण तिने घेतले. यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करणार आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या कबीर खान दिग्दर्शित ‘एक था टायगर’ या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे चित्रीकरण ऑस्ट्रिया आणि अबूधाबी या देशांत झाले आहे.