टॉलिवूड चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री शालू चौरसियावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. रविवारी (१४ नोव्हेंबर) रात्रीच्या वेळी हैद्राबादमधील बंजारा हिल्सजवळील केबीआर पार्कजवळ ही घटना घडली. यावेळी हल्लेखोरांनी तिचा मोबाईल हिसकावून पळ काढला. तसेच तिचे पैसे आणि वस्तूही हिसकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालू ही रविवारी रात्री ८.३०च्या सुमारास फिरण्यासाठी गेली होती. ती हैद्राबादमधील बंजारा हिल्सजवळील केबीआर पार्कजवळ बसली होती. यावेळी रात्री ११ च्या सुमारास एका अज्ञाताने तिच्यावर हल्ला केला. यावेळी आरोपीने तिला पैसे आणि सामान दे,अशी धमकी दिली. मात्र तिने नकार दिल्यानंतर धारदार शस्त्राने तिच्या चेहऱ्यावर वार केला. तसेच तिच्या दिशेने दगडही फिरकावले. या हल्ल्यात ती गंभीररित्या जखमी झाली. यानंतर आरोपींनी जबरदस्तीने तिचा मोबाईल आणि इतर सामान हिसकावून त्या ठिकाणाहून पळ काढला.

Video : “..हे घडलं होतं त्या दिवशी”, राघव जुयालनं शेअर केला ‘तो’ व्हिडीओ!

यावेळी शालूच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेनंतर शालू यांनी बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी ३९२ कलमान्वये त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची संपूर्ण चौकशी केली जात आहे. सध्या पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे. मात्र अद्याप याबाबत आरोपींना अटक झालेली नाही.

पुणे: अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात पत्नीची कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार; गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान बंजारा हिल्सजवळील केबीआर पार्कमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्ती, व्यापारी आणि राजकीय नेते सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला येतात. यापूर्वी अनेकदा उद्यानाभोवती चेन स्नॅचिंगच्या घटनाही समोर आल्या आहेत.