हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझने आपले अलिशान घर विकायला काढले आहे. या घराची किंमत तब्बल तीन कोटी ७० लाख पाऊंड इतकी आहे. या घरात सात बेडरूम, नऊ बाथरूम, एक वाचनालय असून, हजारो एकरावर पसरलेल्या राष्ट्रीय उद्यानात जाण्यासाठी या घरातून थेट मार्ग आहे. अमेरिकेत अनेक ठिकाणी मालमत्ता असलेल्या या ५२ वर्षीय अभिनेत्याने स्थानिक दगडाच्या माध्यमातून साकारलेले हे भव्य घर स्वत:साठी बनवून घेतले होते. २००६ मध्ये टॉम क्रुझ आणि त्याची पत्नी केट होल्मसने या अलिशान घरात माध्यमांसाठी त्यांची मुलगी ‘सुरी’च्या फोटोसेशनचे एका भव्य कार्यक्रमाद्वारे आयोजन केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2014 रोजी प्रकाशित
टॉम क्रुझचे कोट्यवधींचे अलिशान घर विक्रीला
हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझने आपले अलिशान घर विकायला काढले आहे. या घराची किंमत तब्बल तीन कोटी ७० लाख पाऊंड इतकी आहे.
First published on: 17-11-2014 at 01:49 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tom cruise puts ranch on sale at 37 million pounds