अभिनेता फरहान अख्तरचा ‘तूफान’ हा सिनेमा लवकरत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचे निर्माते रितेश सिधवानी यांनी नुकतीच जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल, मनोज सिन्हा यांची भेट घेतली. रितेश सिधवानी यांनी आपल्या सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट शेअर करून उपराज्यपालांच्या भेटीबद्दल आभार व्यक्त केले. या भेटीत चित्रपट आणि जम्मू काश्मीर मधील सुंदर खोऱ्यात चित्रीकरणासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटले आहे.

रितेश आणि राज्यपालांनी जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यामध्ये चित्रपट आणि चित्रपटाच्या प्रसार आणि प्रचाराबाबत गहन चर्चा केली तसंच, सुंदर अशा जम्मू- कश्मीरमध्ये चित्रिकरण करण्याबाबत उत्साही चर्चा करताना हे चित्रीकरणासाठी सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक असल्याचे सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रितेश यांनी ट्विट करत या भेटीची माहिती दिली. या ट्विटमध्ये त्यांनी कश्मीरचे उपराज्यपाल, मनोज सिन्हा यांचे आभार मानले आहेत.
रितेश यांनी नेहमीच आपल्या वेब सिरीज आणि चित्रपटांच्या कलात्मकता आणि यशस्वीतेसोबतच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना नेहमीच त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सची उत्सुकता राहिली आहे. रितेश यांच्याकडे त्यांचा आगामी प्रोजेक्ट फरहान अख्तर स्टारर ‘तूफ़ान’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे, त्याचा प्रीमियर अमेझॉन प्राईम व्हिडिओवर 21 मे 2021 ला होणार आहे.