सध्या बॉलिवूडचा ‘कूल बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रणवीर सिंग त्याच्या ‘पद्मावत’ सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील त्याच्या अभिनयामुळे सर्व क्षेत्रातून त्याचे भरभरून कौतुक केले जात आहे. नुकताच रणवीरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रणवीर स्वित्झर्लंडमध्ये क्रिकेट खेळताना उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसत आहे. एवढेच नाही तर आमिर खानच्या ‘लगान’ सिनेमातील गाण्याचे पाश्वसंगीतही मॅच दरम्यान ऐकू येतं.
छायाचित्रकार रोहन श्रेष्ठच्या गोलंदाजीवर रणवीर आक्रमक फलंदाजी करत होता. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ताणल्या गेलेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर रणवीर एखाद्या कसलेल्या खेळाडूसारखा षटकार मारताना दिसला आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहणं कोणत्याही करमणुकीपेक्षा कमी नाही. या व्हिडिओतही तो नेहमीप्रमाणे त्याच्या अंदाजात सभोवतालच्या व्यक्तींचे मनोरंजन करताना दिसतो.
…अन् रणवीर सिंगने शेवटच्या चेंडूत लगावला षटकार
PHOTOS : .. असा साजरा झाला करणच्या यश-रुहीचा वाढदिवस
PHOTO : ‘चला हवा येऊ द्या’ फेम हा अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत
एकट्या अक्षयवर लागलेत ७०० कोटी!
हॅकर्सच्या हिटलिस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटी
माधुरीच्या ‘एक दोन तीन’ गाण्यावर थिरकणार ही अभिनेत्री
3 Storeys Trailer Release: नव्या अंदाजात दिसणार रेणुका शहाणे
नागराज मंजुळेंना धक्का, विद्यापीठाच्या मैदानातून चित्रपटाचा सेट हटवण्याचे आदेश