Tripti Dimri Shares Her Experience After Working In Animal Movie : २०१८ मध्ये ‘लैला मजनू’ या चित्रपटातून तृप्ती डिमरीने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटातून या अभिनेत्रीला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.

या चित्रपटात तिची भूमिका खूपच लहान होती, परंतु रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन्स देऊन ती प्रसिद्ध झाली. इंटिमेट सीन्समुळे तिला खूप टीकेलाही तोंड द्यावे लागले.

या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती, पण तितकीच त्यावर टीकाही झाली. तृप्ती डिमरीने ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी तिच्या बहिणीने मदत केल्याचे तृप्तीने सांगितलं. एका मुलााखतीमध्ये अभिनेत्रीने याबद्दल खुलासा केला.

तृप्तीने कमेंट्स वाचणे बंद केले होते

अलीकडेच तृप्तीने ‘टू फिल्मी’बरोबर संवाद साधला. अभिनेत्री म्हणाली की तिच्या बहिणीने तिच्या कारकिर्दीत खूप मोठा आधार दिला आहे. अ‍ॅनिमलदरम्यान, द्वेषपूर्ण कमेंट्स वाचून ती अस्वस्थ व्हायची. ट्रोल झाल्यानंतर तृप्तीने सांगितले की, तिने कमेंट्स वाचणे बंद केले होते. पुढे ती म्हणाली, “माझी बहीण रात्रभर जागून त्या सगळ्या कमेंट्स वाचायची, त्यामुळे तिला खूप डिप्रेशन आलं होतं. शिवाय या सगळ्याचा परिणाम माझ्यावर होईल असं तिला वाटत होतं.”

तृप्ती पुढे म्हणाली, त्यावेळी माझ्या बहिणीने मला एक सल्ला दिला, तुम्ही चांगलं काम केलं तरी लोक बोलतच राहतील, त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी मनापासून कराव्या वाटतात त्या करा. हे तुझं आयुष्य आहे आणि ते आपल्याला फक्त एकदाच जगायला मिळतं. तुम्ही चुका करता पण त्यातून शिकता; असं तिने मला सांगितलं होतं.

तृप्ती म्हणाली, “माझी बहीण पहिल्या दिवसापासून माझ्याबरोबर होती. जेव्हा जेव्हा मला ऑडिशनमध्ये नकार मिळायचा, मी माझ्या बहिणीला फोन करायचे आणि रडायचे. तेव्हा ती मला, तुला खूप मेहनत करायची आहे, कोणी काहीही बोलेल त्यावर लक्ष देऊ नको असं म्हणायची.

‘धडक २’ मध्ये दिसणार तृप्ती डिमरी

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर तृप्ती लवकरच ‘धडक २’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होईल. या चित्रपटात ती सिद्धांत चतुर्वेदीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.