सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून एका अभिनेत्रीचा एमएमएस व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये या अभिनेत्रीचे तिच्या जोडीदारासोबतचे काही खासगी क्षण कैद झाले असून अनेक युट्यूब चॅनेल्सवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे त्रिशा कर मधू. त्रिशा ही भोजपुरी चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री आहे. ती तिच्या बोल्ड व्हिडीओमुळे कायमच चर्चेत असते. मात्र आता ती या एमएमएसमुळे चर्चेत आलीय. मात्र यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करुनही हा व्हिडीओ व्हायरल होणं थांबलं नसल्याने तीने आता सायबर पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार केलीय. वेगवेगळ्या माध्यमातून हा व्हिडीओ शेअर केला जातोय. मात्र हा व्हिडीओ शेअर करु नये अशी विनंती आता त्रिशानं केली आहे.

त्रिशाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून यासंदर्भात इंटरनेटवर सर्च करणाऱ्याचं प्रमाण वाढलं आहे. त्रिशा आणि तिच्या या लीक व्हिडीओ संदर्भातील की वर्डवरुन सर्च होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ दिसून येत आहे. युट्यूबवर तर या व्हिडीओचा सुरुवातीचा भाग दाखवून संपूर्ण व्हिडीओसाठी डिस्क्रीप्शनमध्ये लिंक देण्याचे प्रकारही दिसून येत आहेत. मात्र या लिंक्सवरुन व्हिडीओ डाऊनलोड करुन ते शेअर करु नका असं आवाहन त्रिशानं केलं आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्रिशाने फेसबुकवर काही दिवसांपूर्वी एक पोस्टही लिहिली होती. ‘देव सगळं बघतो आहे. मला खाली खेचण्यासाठी माझा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. तुमच्या बहिणीशी कोणी लग्न करून दुसऱ्या दिवशी तिच्या मधूचंद्राच्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल केला तर चांगलं वाटेल ना. बिहारमध्ये एवढ्या नीच विचारसरणीचे लोक आहेत याची मला कल्पना मला नव्हती,’ असं त्रिशाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमधून तिने व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांबद्दलचा संताप व्यक्त केलाय. तिने व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना त्यांच्या बहिणीचीही आठवण करुन दिलीय.

trish kar madhu,
MMS व्हायरल झाल्यानंतर त्रिशाकरने ही पोस्ट फेसबूकवर शेअर केली आहे.

आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो त्रिशानेच तयार केल्याच्या चर्चाही सुरु आहेत. मात्र हा व्हिडीओ तिच्या खासगी फोनमधून लिक कोणी केला याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर मात्र त्रिशाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास आता सायबर पोलीस करत असल्याची माहिती समोर आलीय. त्रिशा ही हिंदी पट्यातील राज्यांमधील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.