दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैक एक आहे. समांथा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत होती. पण यावेळी समांथा तिच्या पहिल्या आयटम सॉंग ‘उ अंतावा उ उ अंतावा’मुळे चर्चेत आहे. हे आयटम सॉंग ‘पुष्मा’ या चित्रपटातलं आहे. तिच्या या गाण्यावरून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

समांथा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा समांथा तिच्या ट्रोल्सला सडेतोड उत्तर देताना दिसली आहे. दरम्यान, एका नेटकऱ्याने समांथाला तिच्या घटस्फोटावरून ट्रोल केले आहे. “घटस्फोटित सेकंड हँड आयटम आणि समांथावर एका ‘सज्जन व्यक्ती’कडून ५० कोटी रुपये लुटल्याचा आरोप त्या नेटकऱ्याने केला.” तो सज्जन व्यक्ती दुसरा कोणी नसून त्या व्यक्तीने ते तिचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यला म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘गहराइयां’च्या टीझर पेक्षा दीपिकाचा किस आणि बिकिनी चर्चेत!

आणखी वाचा : कपिल शर्मा एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी घेतो इतके पैसे, अभिनेत्याचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकऱ्याचे हे ट्वीट पाहिल्यानंतर समांथाने त्याला बुद्धीनसल्याचे म्हणतं, “देवाचा आशीर्वाद तुझ्यासोबत राहो”, असे ट्वीट केले आहे. समांथाला ट्रोल केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, समांथाचं हे पहिलं आयटम सॉंग आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसत आहेत. ‘पुष्मा’ हा चित्रपट तेलुगू, तामिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड अशा ६ भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.