अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. ते नेहमी एकमेकांवर विनोद करताना दिसतात. नुकतेच ट्विंकलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ट्विंकलने सोशल मीडियावर दाखवण्यात आलेली जोडी आणि खऱ्या आयुष्यात ती जोडी कशी असते याचा फरक सांगितला आहे.

ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ट्विंकल आणि अक्षय आनंदात पोज देताना दिसता आहेत. तर दुसरीकडे ट्विंकल अक्षयचं नाक दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत घटस्फोटापासून वाचण्याच कारण ट्विंकलने सांगितले आहे. “इन्स्टाग्रामवरील जोडी आणि खऱ्या आयुष्यातील जोडी. आपण ज्या प्रमाणे कॅमेऱ्यासमोर आनंदी राहतो तसेच जर आपण खऱ्या आयुष्यात एकमेकांकडे पाहून हसलो तर घटस्फोट होणार नाहीत #smileokplease “असे हॅशटॅग देखील दिले आहे. अशा आशयाचे कॅप्शन ट्विंकलने त्या फोटोला दिले आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून ३ लाख पेक्षा जास्त लोकांनी त्याला लाईक केले आहे. तर नेटकऱ्यांनी त्यांच्या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अक्षय आणि ट्विंकलने १७ जानेवारी २००१ रोजी विवाह केला होता. त्यांच्या लग्नाला नुकतीच २० वर्षे झाली आहेत. तसेच त्यांना दोन मुलंही झाली आहेत.