सध्या बॉक्स ऑफिसवर हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझचा ‘मिशन इम्पॉसीबल ७’ हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. यातील सगळे स्टंट्स स्वतः करणारा स्टार टॉम क्रूझ हा जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक म्हणूनही ओळखला जातो. या हॉलिवूड स्टारच्या जवळपास फक्त एकच भारतीय अभिनेता आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे शाहरुख खान. यंदाचं वर्षं शाहरुख खानसाठीही उत्तम ठरलंय हे आपण ‘पठाण’च्या माध्यमातून पाहिलंच.

एकूण संपत्तीच्या बाबतीत बॉलिवूडच्या किंग खानला अन् हॉलिवूडच्या टॉम क्रूझला नुकतंच एका अमेरिकन स्टारने मागे टाकलं आहे. ग्लोबल स्टार म्हणून दबदबा असलेल्या शाहरुख खान अन् टॉम क्रूझला संपत्तीच्या बाबतीत मागे टाकणारा हा स्टार नेमका आहे तरी कोण?

आणखी वाचा : रामायणावर बेतलेल्या आगामी कलाकृतीबद्दल नितेश तिवारींचं वक्तव्य चर्चेत म्हणाले, “मी लोकांच्या भावनांचा…”

‘फोर्ब्स’च्या यादीनुसार या दोन जागतिक किर्तीच्या सुपरस्टार्सना मागे टाकणारा ५३ वर्षांचा अमेरिकन स्टार टायलर पेरी आहे. केवळ अभिनयच नव्हे तर इतरही क्षेत्रात टायलर पेरीचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो. ‘फोर्ब्स’च्या नुकत्याच हाती आलेल्या रिपोर्टनुसार टायलर पेरीची एकूण संपत्ती जवळपास ८२६७ कोटी इतकी आहे. ६००० कोटींची संपत्ती असलेल्या शाहरुख खान अन् टॉम क्रूझलाही यंदा टायलरने मागे टाकलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टायलर पेरी हा एक उत्तम अभिनेता आहेच शिवाय तो अमेरिकेतील एक उत्तम नाटककार आणि उद्योगपतीदेखील आहे. याबरोबरच तिथल्या टेलिव्हिजन क्षेत्रातही टायलर पेरी प्रचंड लोकप्रिय आहे. याबरोबरच बऱ्याच वेबशोजची मालकीही टायलर पेरीकडेच असल्याने त्याची या श्रीमंत कलाकारांच्या यादीत वर्णी लागली आहे. याबरोबरच टायलरचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊसही आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून बक्कळ पैसा कमावणारा टायलर पेरी हा जगातील श्रीमंत अभिनेता ठरला आहे.