बॉलिवूड अभिनेता उदय चोप्राने वहिनी राणी मुखर्जीचे चोप्रा कुटुंबात स्वागत केले. सोमवारी (एप्रिल २१) उदय चोप्राचा मोठा भाऊ आदित्यने अभिनेत्री राणी मुखर्जीशी इटलीत एका छोटेखानी समारंभात लग्न केले. या लग्नाबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. राणीचे स्वागत करणारा उदय टि्वटरवरील आपल्या संदेशात म्हणतो, ‘आम्ही राणी चोप्राचे कुटुंबात स्वागत करतो. नवीन जोडप्यास खूप प्रेम.’ ३६ वर्षीय राणी मुखर्जीनेदेखील आपल्या लग्नास एका परिकथेचा पुढचा भाग म्हणून संबोधले आहे. २०१२ च्या ऑक्टोबर महिन्यात निधन पावलेले महान चित्रपटकर्ता आणि सासरे यश चोप्रांची आयुष्यातील या महत्वाच्या क्षणी राणीला खूप आठवण आली.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2014 रोजी प्रकाशित
उदय चोप्राकडून वहिनी राणी मुखर्जीचे स्वागत!
बॉलिवूड अभिनेता उदय चोप्राने वहिनी राणी मुखर्जीचे चोप्रा कुटुंबात स्वागत केले. सोमवारी (एप्रिल २१) उदय चोप्राचा मोठा भाऊ आदित्यने अभिनेत्री राणी मुखर्जीशी इटलीत एका छोटेखानी समारंभात लग्न केले.
First published on: 22-04-2014 at 08:39 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday welcomes sister in law rani chopra mukerji into family