scorecardresearch

“एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामुळे…” अभिनेता उमेश कामतची ‘ती’ पोस्ट चर्चेत

उमेश कामतची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.

umesh kamat, hruta durgule, dada ek good news ahe, dada ek good news ahe show cancel, umesh kamat instagram, hruta durgule instagram post, उमेश कामत, हृता दुर्गुळे, दादा एक गुड न्यूज आहे, उमेश कामत इन्स्टाग्राम, दादा एक गुड न्यूज आहे शो रद्द
उमेशनं त्याचं गाजलेलं नाटक 'दादा एक गुड न्यूज आहे'च्या संदर्भात केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

मराठमोळा अभिनेता उमेश कामत मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. उमेश कामत सोशल मीडियावरही बराच सक्रिय असत. सोशल मीडियावर त्याचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच बरेचदा त्याच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरलही होताना दिसतात. नुकतीच उमेशनं त्याचं गाजलेलं नाटक ‘दादा एक गुड न्यूज आहे’च्या संदर्भात केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या उमेश कामतनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याच्या ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसतेय. आपल्या पोस्टमध्ये उमेश कामतनं लिहिलं, ‘एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामुळे ५ जूनचा चिंचवड येथील ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचा प्रयोग रद्द. प्रेक्षकांचे तिकिटाचे पैसे परत करण्यात येतील.’

आणखी वाचा- Video: रणजीत ढालेपाटील पुन्हा दिसणार वर्दीत! ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत नवं वळण

उमेश कामतची ही पोस्ट अभिनेत्री हृता दुर्गुळेनं देखील तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. दरम्यान ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकात उमेश कामत आणि हृता दुर्गुळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. मागच्या दोन वर्षांपासून हे नाटकं बरंच गाजताना दिसत आहे. बहीण भावाच्या नात्याची गोड गोष्ट असलेल्या या नाटकाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

आणखी वाचा- ‘मस्जिद है या शिवाला…’ ज्ञानवापी मशीद वादानंतर मनोज मुंतशीर यांची कविता व्हायरल

दरम्यान उमेश कामतच्या कामाबद्दल बोलायचं तर तो काही काळापूर्वी ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत दिसला होता. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री मुक्ता बर्वेची मुख्य भूमिका होती. याशिवाय त्याची ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही वेब सीरिजही बरीच गाजली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Umesh kamat hruta durgule drama dada ek good news ahe show cancel because of political event mrj

ताज्या बातम्या