‘बिग बॉस ओटीटी’ची स्पर्धक उर्फी जावेद गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. उर्फी सतत तिच्या ड्रेसिंगमुळे चर्चेत असते. तिला तिच्या ड्रेसिंगमुळे नेहमीच लोक ट्रोल करतात. कधी पॅन्टची बटन उघडी ठेवल्यामुळे तर कधी सॉक्स पासून बनलेला टॉप परिधान केल्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते. बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या उर्फीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या ऑडिशनच्या दिवसांविषयी सांगितले आहे.

उर्फीने ‘आज तक’ला नुकतीच मुलाखत दिली होती. यावेळी तिने तिच्या ऑडिशनच्या दिवसांविषयी सांगितले आहे. ‘जेव्हा मला ड्रेस बदलून दुसऱ्या ऑडिशनला जायचे होते, तेव्हा मी जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन वॉशरूममध्ये कपडे बदलायची. एकदा मी सलवार सूट घालून ऑडिशनसाठी कुठेतरी गेली होती, तर दुसऱ्या ऑडिशसाठी मला शॉर्ट्स परिधान करायची होती. वॉशरूममध्ये गेल्यानंतर मी शॉर्ट्स परिधान करून बाहेर आले तेव्हा लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते’, असे उर्फीने सांगितले.

आणखी वाचा : वयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे उर्फी म्हणाली, ‘बऱ्याच वेळी मी माझ्या मित्र-मैत्रिणींच्या घरी जाऊन कपडे बदलत असे. एकदा यावर खूप मोठा गोंधळ झाला होता. जेव्हा मी सलवार घालून मित्राच्या घरी जायचे तेव्हा मी वेस्टर्ट ड्रेस परिधान करून बाहेर यायची. एकदा त्याच्या शेजाऱ्यांनी माझ्या मित्राच्या घरमालकाकडे याबाबत तक्रार केली. यानंतर माझ्या मित्राने घाबरून माझी मदत करण बंद केलं.’

आणखी वाचा : गर्भवती असताना सैफसोबतच्या ‘सेक्स लाइफ’विषयी करीना कपूरने केलं होतं भाष्य म्हणाली…

काही दिवसांपूर्वी उर्फी तिच्या जींस पॅन्टमुळे चर्चेत आली होती. त्या पॅन्टची तिने बटन उघडी ठेवली होती. यावरून तिला लोकांनी ट्रोल केले होते.