उर्फी जावेद तिचे विचित्र कपडे आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. कधी एअरपोर्ट तर कधी स्वतःच्याच घराच्या खाली उर्फी जावेद नेहमीच नव्या लुकमध्ये स्पॉट होते. सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ आणि फोटो नेहमीच चर्चेत असतात. आताही तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तिने खूप स्वतःच्या कपड्यांबाबत खूपच बोल्ड वक्तव्य केलं आहे. आपल्या बोल्ड वक्तव्यामुळे उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

उर्फी जावेद मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आणि सक्रिय असणारी व्यक्ती ठरत आहे. घरातून बाहेर पडताच ती पॅपराजींनी तिला घेरलेलं नेहमीच पाहायला मिळतं. आपल्या अतरंगी फॅशनमुळे कितीही टीका झाली तरीही उर्फी रोज नवनवीन ड्रेस घालून सर्वांना सरप्राइज देताना दिसते. जेव्हा तिच्या या फॅशनबद्दल तिला विचारण्यात आलं तेव्हा तिने यावर खूपच बोल्ड स्टेटमेंट दिलं. ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

उर्फीला तिच्या फॅशन आणि ड्रेसबद्दल विचारण्यात आल्यावर ती म्हणाली, “एक दिवस मी कपडेच घालणार नाही. काय सरप्राइज यार. माझे सगळे आउटफिट्सच सरप्राइज असतात. मी असं काही ठरवून करत नाही की, मला चाहत्यांना काही सरप्राइज द्यायचं आहे. मला जे आवडतं ते मी घालते.” सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना उर्फीने कमी शब्दात उत्तर दिलं असलं तरीही तिच्या या वक्तव्याची चर्चा मात्र होताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान उर्फी नेहमीच तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अर्थात तिच्या अतरंगी आणि शॉर्ट ड्रेसमुळे अनेकदा तिला सोशल मीडियावर ट्रोलही व्हावं लागतं मात्र उर्फी अशाप्रकारच्या टीकेकडे दुर्लक्ष करताना दिसते. “लोक मला ट्रोल करत असले तरीही ते माझ्या बद्दल बोलतात. नकारात्मक का असेना मला त्यातून प्रसिद्धी मिळते आणि हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.” असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.