मागच्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि मॉडेल उर्फी जावेद यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली होती. यासंदर्भात त्यांनी पत्रही दिलं होतं. त्यावर ‘माझा नंगानाच सुरूच राहील’, असं उत्तर उर्फीने दिलं होतं.

दोघींचं भांडण वाढल्यानंतर उर्फी ट्विटरवर चारोळ्या टाकत चित्रा वाघ यांनी डिवचत आहे. “चित्रा वाघ जी आय लव्ह यू,” असं ट्वीट करत तिने एक फोटो टाकला होता.

त्यानंतर “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा वाघ मेरी सासू”, असं ट्वीट तिने केलं होतं.

“उर्फी के अंडरविअरमें छेद है, चित्राताई ग्रेट है,” अशा आशयाचं ट्वीटही तिने केलं होतं.

“उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा वाघ अशी कशी गं तू सास”, असं ट्वीटही तिने केलं होतं.

“चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर मे होने वाली सास है” असं ट्वीटही तिने केलं होतं.

आणखी वाचा – ‘चित्रा मेरी सासू’ म्हणणाऱ्या उर्फीला चित्रा वाघ यांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाल्या “छत्रपतींच्या महाराष्ट्रात…”

दरम्यान, सातत्याने उर्फी जावेद चित्रा वाघ यांचा सासू म्हणत उल्लेख करत आहे. यामुळे उर्फीचा खरंच चित्रा वाघ यांच्या मुलावर जीव जडलाय का? अशी मिश्किल टिप्पणीही अनेक जण करत आहेत. अशातच तुम्हाला कदाचित माहित नसेल पण चित्रा वाघ यांना एक मुलगा आहे आणि त्याचं नाव आदित्य वाघ आहे. ‘झी न्यूज’ने ही माहिती दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
chitra wagh with son aditya wagh
चित्रा वाघ पती किशोर वाघ आणि मुलगा आदित्य वाघ यांच्याबरोबर (फोटो – सोशल मीडिया)
(फोटो – चित्रा वाघ यांच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

आता चित्रा वाघ व उर्फी जावेद यांच्यातील हा शाब्दिक वार कधी थांबेल की उर्फी जावेद अशी त्यांना ट्वीट करून डिवचत राहील, हे येत्या काळातच कळेल.