अतरंगी कपड्यांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फी जावेदविरोधात भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर चित्रा वाघ यांनी याप्रकरणी पत्रकार परिषदही घेतली.

चित्रा वाघ यांनी “उर्फीला थोबडवेन” असं विधान केलं होतं. त्यामुळे उर्फी व चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू झाला आहे. चित्रा वाघ यांना उर्फी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून उत्तर देत आहे. चित्रा वाघ यांच्याबरोबर वाद सुरू असतानाच उर्फीने हातात बेड्या घातलेला बिकिनीतील बोल्ड व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. आता पुन्हा उर्फीने स्टोरीमधून चित्रा वाघ यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

हेही वाचा>>Video: “कोल्हापूरला येण्यासाठी…”, जिनिलीयाने रितेश देशमुखसाठी घेतला खास उखाणा

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक ट्वीट शेअर केलं आहे. “उर्फी जावेदचे कपडे हे दिल्लीतील घटना व मुलींवर होणाऱ्या बलात्कारापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत”, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत उर्फीने “माझंही हेच म्हणणं आहं. राजकारण्यांनो, तुम्ही माझ्यावर नजर ठेवून आहात, हे मला माहीत आहे. त्यामुळे प्लीज हे वाचा”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा>> चित्रा वाघ यांच्याबरोबर वादादरम्यान उर्फीने स्वत:लाच घातल्या बेड्या; बिकिनी घालून पुन्हा शेअर केला बोल्ड व्हिडीओ

urfi javed

हेही पाहा>> Photos: ‘तू तेव्हा तशी’ फेम अभिनेत्याची लगीनघाई, साखरपुड्याचे फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फीच्या चित्रविचित्र कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. परंतु, हा नंगानाच असाच सुरू राहणार असल्याचं उर्फी म्हणाली आहे.