scorecardresearch

विस्कटलेले केस, सुजलेले डोळे अन्…; उर्फी जावेदला नेमकं झालंय तरी काय?

मागच्या काही काळापासून सतत चर्चेत असलेल्या उर्फी जावेदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

विस्कटलेले केस, सुजलेले डोळे अन्…; उर्फी जावेदला नेमकं झालंय तरी काय?
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

उर्फी जावेद मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवरून टीका करत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर उर्फी विरुद्ध चित्रा वाघ असं सोशल मीडियावर वॉर पाहायला मिळत आहे. अशातच आता उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती विस्कटलेले केस आणि सुजलेले डोळे अशा अवतारात दिसत आहे. एवढंच नाही तर पापराझींना पाहिल्यानंतर ती तोंड लपवून पळताना दिसत आहे.

आपल्या विचित्र फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात उर्फी जावेद रात्री उशीरा डिनरसाठी आलेली दिसत आहे. त्याचवेळी फोटोग्राफर्स तिला घेरतात. यावेळी ती ओव्हरसाइज टी-शर्ट आणि शॉर्ट्सवर दिसत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावर अजिबातच मेकअप नाहीये. तिचे केस विस्कटले आहेत, डोळे सुजलेले आहे आणि ती मास्क लावून आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत आहे. नेहमी कॅमेरासमोर राहणारी उर्फी यावेळी मात्र तोंड लपवून पळताना दिसत आहे.

आणखी वाचा- “मी आत्महत्या करेन किंवा…”, चित्रा वाघ यांच्या वक्तव्यानंतर उर्फी जावेदने केलेली पोस्ट चर्चेत

हेही वाचा – चित्राताई वाघ, उर्फीवर कारवाई करण्यास एवढा उशिराचा मुहूर्त का?

या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यानंतरही फोटोग्राफर्सनी तिचा पाठलाग सोडलेला नाही असं दिसत आहे. त्यानंतर उर्फीचे जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्यात तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं झाल्याचंही दिसत आहे. उर्फीचं हे बदलेलं रुप पाहून सगळेच हैराण झाले आहेत. तर काही चाहते मात्र तिला कॅज्युअल लूकमध्ये पाहून खुश झाले आहेत. तिच्या या व्हिडीओवर चाहते मजेदार कमेंट्स करताना दिसत आहेत.

आणखी वाचा- “तुम्हाला संजय राठोड आठवतात का?” उर्फी जावेदचा चित्रा वाघ यांना थेट प्रश्न

दरम्यान चित्रा वाघ यांनी एफआयआर नोंदविल्यानंतर उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून त्यांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर चित्रा वाघ यांनी “उर्फी मला कुठे दिसली, तर तिला मी थोबडवून काढेन”, असं विधान केलं होतं. चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यावर उर्फीने दिल्लीच्या घटनेचा व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलं होतं. भाजपाशी संबंधित असलेल्या आरोपीविरोधात आवाज उठवणार का?, असा प्रश्न उर्फीने चित्रा वाघ यांना विचारला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 10:11 IST

संबंधित बातम्या