अतरंगी फॅशनमुळे आणि वादांमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेदला सध्या एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. उर्फीला मुंबईत राहण्यासाठी भाड्याने घर हवं आहे, पण तिला कुणीही घर देत नाहीये. तिने यासंदर्भात ट्वीट केलंय आणि मुंबईत भाड्याने घर मिळत नसल्याची माहिती दिली आहे.

कपड्यांमुळे आणि धर्मामुळे घर भाड्याने मिळत नसल्याचं उर्फी म्हणत आहे. “माझ्या कपड्यांमुळे मुस्लीम मालक मला घर भाड्याने देत नाहीत, मी मुस्लिम आहे म्हणून हिंदू मालक मला भाड्याने देत नाहीत. काही मालकांना मला मिळणाऱ्या राजकीय धमक्यांची भीती वाटते. मुंबईत भाड्याने अपार्टमेंट शोधणे खूप अवघड आहे,” असं उर्फीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

या ट्वीटवर काही नेटकऱ्यांनी तिला घर भाड्याने न मिळणं चुकीचं आहे, असं म्हटलंय. तर, काही जणांनी मात्र ‘तू असे विचित्र कपडे घालण्याआधी या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा होतास’, असंही म्हटलंय. अनेक नेटकरी तिला इतर शहरांमध्ये घर हवं असल्याचं मदत करू, असंही म्हणत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मागचे काही दिवस उर्फी जावेद सातत्याने चर्चेत होती. चित्रा वाघ यांच्याबरोबर झालेल्या वादानंतर तिला धमक्याही आल्या होत्या. तसेच तिच्याविरोधात तक्रारही झाली होती, त्यामुळे तिला महिला आयोगात जबाबही नोंदवावा लागला होता.